Join us
Daily Top 2Weekly Top 5

बरेच वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर या अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप, म्हणाली- "माझ्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 15:27 IST

1 / 10
साऊथचा सुपरस्टार कमल हासनची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हासन नेहमी प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. सध्या ती तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे.
2 / 10
खरेतर बऱ्याच मोठ्या कालावधीपासून श्रुती हासन आणि शांतनु हजारिका एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाची चर्चा देखील समोर आली होती. मात्र आता अशी माहिती समोर येत आहे की, दोघांचं ब्रेकअप झाले आहे. त्या दोघांचे ब्रेकअप झाल्याचे समजल्यावर चाहते हैराण झाले आहेत. त्यांचे ब्रेकअप का झालं, हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.
3 / 10
खरेतर, श्रुती आणि शंतनू हजारिका अनेकदा त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात, जे त्यांच्या चाहत्यांनाही खूप आवडतात. पण वृत्तांवर विश्वास ठेवला तर, श्रुती हसन आणि शंतनू हजारिका यांच्यात काहीही चांगले नाही. एका रिपोर्टनुसार, श्रुती आणि शंतनू काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत.
4 / 10
इतकंच नाही तर दोघांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांना अनफॉलोही केलं आहे. त्याचबरोबर श्रुतीने शंतनू आणि तिचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओही तिच्या इंस्टाग्रामवरून हटवले आहेत. अशा परिस्थितीत दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून दोघांचे ब्रेकअप झाल्याचे मानले जात आहे.
5 / 10
श्रुती हासन आणि शंतनू हजारिका बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही बराच काळ एकत्र राहत होते. काही काळापूर्वी श्रुतीने शंतनूचीही तिच्या कुटुंबीयांशी ओळख करून दिली होती. मात्र आता दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले असून या बातमीने त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
6 / 10
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, श्रुती आणि शंतनू यांच्यात गेल्या काही काळापासून बरेच गैरसमज आहेत, ज्यामुळे त्यांच्यात भांडणे होत आहेत. कदाचित याच कारणामुळे दोघेही आता एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.
7 / 10
दरम्यान श्रुतीने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत रिलेशनशीपच्या मुद्द्यावर भाष्य केले. त्यामुळे तिच्या ब्रेकअपच्या चर्चांना देखील दुजोरा मिळत आहे.
8 / 10
श्रुती म्हणाली की, जर एखाद्या नात्यातून तुम्हाला आनंद मिळत आहे, ते तुमच्यासाठी चांगलं असेल तर ते नक्कीच तुमच्यासाठी योग्य आहे. पण मला असं वाटतं की, तुमच्या पार्टनरला जसं हवं तसं स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जोडीदाराला गृहित धराल.
9 / 10
माझ्याबाबतीत असे झाले तर मला ते चालणार नाही. मी नात्यांमध्ये खूप प्रमाणिक आहे आणि विश्वासार्ह आहे आणि मला असेच कोणीतरी हवे आहे. तुम्ही जर असे नसाल तर ठिक आहे, काही हरकत नाही, असे ती या मुलाखतीत म्हणाली.
10 / 10
श्रुती हासन आणि शंतनू हजारिका हे दोघे २०२० पासून रिलेशनशिपमध्ये होते. त्याआधी श्रुती अभिनेता मायकेल कॉर्सेलला डेट करत होती. पण तिचे तेही रिलेशन फार काळ टिकले नाही.
टॅग्स :श्रुती हसनकमल हासन