Join us  

बीटाऊनमध्ये नव्या कपलची चर्चा, आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे वर खिळल्या नजरा; रॅम्प वॉकचे Photos व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 2:02 PM

1 / 8
बॉलिवूडमध्ये सतत लिंकअप किंवा ब्रेकअपच्या चर्चा सुरु असतात. सध्या एक फ्रेश जोडी फारच ट्रेंडिंग आहे. ती म्हणजे बबली गर्ल अनन्या पांडे (Ananya Pande) आणि हॅंडसम हिरो आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor). दोघांच्या अफेअरच्या चर्चा बीटाऊनमध्ये सुरु आहे.
2 / 8
काल रात्री लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रॅंड फिनालेमध्ये दोघांनी एकत्र रॅम्प वॉक केला. दोघांच्या केमिस्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधले.रॅम्प वॉक दरम्यान मध्येच या जोडीने रोमॅंटिक पोजही दिल्या.
3 / 8
कधी एकमेकांच्या डोळ्यात बघत दोघे गुंग झाले होते. तर कधी एकमेकांकडे बघत हसताना दिसत आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनाही हे फोटो खूप पसंतीस पडत आहेत.
4 / 8
लॅक्मे फॅशन वीकमध्ये आदित्य आणि अनन्याने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक केला. अनन्याने काळ्या रंगाचा प्रिंटेड बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता तर केप जॅकेट घातले होते.
5 / 8
तर आदित्यने या ब्लॅक सूटमध्ये खूपच हॅंडसम दिसत होता. मनीष मल्होत्राच्या नव्या कलेक्शनमध्ये दोघांनी हजेरी लावली आणि उपस्थितांचे लक्ष वेधले. आधी दोघांनी वेगवेगळी एंट्री घेत रॅम्प वॉक केला.
6 / 8
अनन्याचे वडील अभिनेता चंकी पांडे यावेळी लेकीला प्रोत्साहन देत होते. तेव्हा अनन्याही त्यांना स्माईल देत चालत होती. अनन्या या आऊटफिटमध्ये खूपच क्वर्की आणि ड्रामेटिक दिसत होती. मला या आऊटफिटबद्दल सगळंच आवडलं असंही ती म्हणाली.
7 / 8
आदित्य आणि अनन्या खरंच एकमेकांना डेट करत आहेत का हे अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांच्या पब्लिक अॅपिरिअन्स वरुन हे लक्षात येतं की दोघांच्यात काहीतरी शिजतंय.
8 / 8
आदित्य अनन्याहून १३ वर्षांनी मोठा आहे. अनन्या सध्या २४ वर्षांची असून आदित्य ३७ वर्षांचा आहे. दोघेही सिंगल असल्याने एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांच्यातील मैत्री चांगलीच फुलली असल्याचं दिसून येत आहे.
टॅग्स :अनन्या पांडेआदित्य रॉय कपूरमनीष मल्होत्राबॉलिवूडव्हायरल फोटोज्