1 / 12अदा शर्मा ही अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीशी जोडलेली आहे, परंतु द केरळ स्टोरी (2023) हा चित्रपट हिट झाल्यापासून ती जोरदार चर्चेत आहे. त्यानंतर अदा शर्माही सोशल मीडियावर खूप सक्रिय राहू लागली. 2 / 12चित्रपटांसोबतच अदा शर्मा वेब सीरिजमध्येही काम करत आहे. तिचे असंख्य चाहते असून ते तिच्या अदांवर फिदा होतात. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 3 / 1211 मे 1992 रोजी मुंबईत जन्मलेल्या अदा शर्माचे वडील एसएल शर्मा हे इंडियन मर्चंट नेव्हीचे निवृत्त अधिकारी आहेत. तिची आई शीला शर्मा या क्लासिकल डान्सर आणि योग ट्रेनर आहेत. अभिनेत्रीचं शिक्षण आणि प्रॉपर्टीबद्दल जाणून घेऊया...4 / 12अदा शर्माचं सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील वांद्रे भागातील एका कॉन्व्हेंट शाळेत झाले. इथे दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने ठरवलं होतं की तिला अभिनेत्री व्हायचं आहे. तिच्या आई-वडिलांनी तिच्यापुढे तिने आपलं शिक्षण पूर्ण करावं अशी अट घातली होती. 5 / 12अभिनेत्रीने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. ती जिम्नॅस्ट आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिने डान्स करायला सुरुवात केली. मुंबईतील नटराज गोपी कृष्ण कथ्थक डान्स अकादमीमधून कथ्थकमध्ये पदवी प्राप्त केली आहे. 6 / 12अदा 4 महिन्यांसाठी साल्सा शिकण्यासाठी अमेरिकेत गेली होती आणि यासोबतच तिला विविध प्रकारचे डान्स फॉर्म देखील येतात. डान्ससोबतच अदाला मार्शल आर्टही अवगत आहे.7 / 12वेगवेगळ्या भूमिकांसाठी अनेक ऑडिशन्स दिल्या पण प्रत्येक वेळी तिला नकाराचा सामना करावा लागला. काही दिग्दर्शकांना तिचं ऑडिशन आवडलं असलं तरी तिच्या लहान वयामुळे तिला भूमिका मिळू शकल्या नाहीत. 8 / 122009 मध्ये रिलीज झालेल्या विक्रम भट्टच्या 1920 या चित्रपटात अदाला पहिली संधी मिळाली. अदा शर्माने वयाच्या 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि हा चित्रपट यशस्वी ठरला.9 / 12यानंतर अदाने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका केल्या पण तिला हवं तसं यश मिळू शकलं नाही. याच दरम्यान, अदा काही साऊथ चित्रपटांमध्येही दिसली. 2023 मध्ये, The Kerala Story हा चित्रपट प्रदर्शित झाला जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता आणि त्यात अदा मुख्य अभिनेत्री होती. 10 / 12अभिनेत्रीचा मुंबईत स्वत:चा फ्लॅट, स्वत:ची कार आहे. ती आई-वडिलांसोबत राहते. अदा शर्मा आता प्रसिद्ध झाली असली तरी तिच्याकडे इतरही अनेक प्रोजेक्ट आहेत ज्यावर ती काम करत आहे. 11 / 12अदा मुंबईत चांगली लाईफस्टाईल जगत असून आता कोट्यवधींची मालकीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदा शर्मा कडे सध्या 10 ते 12 कोटी रुपयांची संपत्ती आहे.12 / 12