मृणाल कुलकर्णींच्या होणाऱ्या सुनबाईला पाहिलंत का? इतकी गोड की पाहून तुम्हीही म्हणाल WOW
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 16:59 IST
1 / 9मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस अखेर ऑफिशिअली एन्गेज्ड झाला. विराजसने अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा केला आहे.2 / 9शिवानी आणि विराजस दोघांनीही रिंग सेरेमनीचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे.3 / 9एकंदर काय तर आता मृणाल कुलकर्णी सासूबाई होणार आहेत. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या एका मुलाखतीत मृणाल यांनी सून कशी हवी? हे सांगितलं होतं. शिवानी अगदी तशीच आहे.4 / 9होय, माझ्या सूनेबद्दल काहीही अपेक्षा नाहीत. फक्त ती विराजसला पूरक हवी. ती सून म्हणून नव्हे तर त्याची मैत्रिण म्हणून आमच्या घरात यावी. त्याच्या निवडीवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असं मृणाल म्हणाल्या होत्या. निश्चितपणे शिवानी या अपेक्षांवर खरी उतरणारी आहे.5 / 9विराजसची ती चांगली मैत्रिण आहे. प्रेमात पडल्यावर त्यांनी त्यांचे प्रेम कधीच लपवलं नाही. कधी मालिकांच्या सेटवर तर कधी मित्र-मंडळींसोबत एकत्र धम्माल करताना ते दिसायचे.6 / 9शिवानीने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे. शिवानी ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत शेवटची दिसली होती. तर विराजस ‘माझा होशील’ ना या मालिकेत शेवटचा दिसला होता. 7 / 9बनमस्का मालिकेमुळे शिवानी रांगोळे हे नाव घराघरांत पोहोचले. त्यानंतर तिनेअनेक मालिकांमध्ये काम केले.8 / 9 सांग तू आहेस ना ही तिची मालिका गाजली. याशिवाय ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा ’ या मालिकेत बाबासाहेबांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती.9 / 9 विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले आहे.