Join us  

PHOTOS : मराठमोळ्या उर्मिला निंबाळकरचं सेक्सी फोटोशूट, बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 8:00 AM

1 / 9
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर नेहमीच आपल्या नवनवीन पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
2 / 9
अनेकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून ती विविध विषयांवर आपलं मत व्यक्त करत असते. तर अनेकवेळा ती ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देतानाही दिसते.
3 / 9
सध्या चर्चा आहे ती उर्मिलाच्या फोटोंची. होय, उर्मिलाने काही झक्कास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 9
सध्या उर्मिलाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लाल शॉर्ट ड्रेसमध्ये तिने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत.
5 / 9
उर्मिला सध्या सुट्टी एन्जॉय करतेय. नववर्षाच्या स्वागतासाठी ती फॅमिलीसोबत ट्रिपवर गेली आहे.
6 / 9
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत. तू एखाद्या हॉलिवूड अभिनेत्री सारखी दिसतेय, नशीब मी मुलगा नाही. नाहीतर सुकिर्त (उर्मिलाचा नवरा) बॅचलर राहिला असता, असं एका फिमेल युजरने म्हटलं आहे.
7 / 9
एका युजरने तर चक्क तिला डेटसाठी विचारलं आहे. मला माहितीये तू विवाहित आहेत, एका बाळाची आई आहेत. पण तुझ्यासोबत डेटवर जायला आवडेल, असं एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे.
8 / 9
मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, असं म्हणत एका युजरने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. एकंदर काय तर उर्मिलाचे हे फोटो पाहून चाहते खल्लास झाले आहेत.
9 / 9
उर्मिला प्रसिद्ध युट्यूबर असण्यासोबतच एक लोकप्रिय अभिनेत्रीदेखील आहे. तिने दुहेरी, एक तारा, दिया और बाती या मालिकांमध्ये काम केलं आहे. उर्मिलाने २०१२ साली सुकिर्त गुमास्तेसोबत लग्नगाठ बांधली.
टॅग्स :उर्मिला निंबाळकरमराठी अभिनेता