२५ वर्षांची झाली सुनील शेट्टीची मुलगी, लहानपणी अशी दिसायची, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST
२०१५ मध्ये आलेल्या ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री अथिया शेट्टी २५ वर्षांची झाली आहे.
२५ वर्षांची झाली सुनील शेट्टीची मुलगी, लहानपणी अशी दिसायची, पहा फोटो!
२०१५ मध्ये आलेल्या ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री अथिया शेट्टी २५ वर्षांची झाली आहे. ५ नोव्हेंबर १९९२ मध्ये मुंबई येथे जन्मलेली अथिया अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आहे. अथियाला लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. तिच्या आवडीला प्रोफेशन बनविण्यासाठी वडील सुनील शेट्टी, आई माना शेट्टी आणि भाऊ अहान शेट्टी यांनी तिला खूप मदत केली. याच वर्षी अथियाचा मुबारकां हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला होता. सध्या अथियाकडे एकाही चित्रपटाची आॅफर नाही. अथिया अनेक ब्रॅण्ड्स आणि साप्ताहिकासाठी फोटोशूट करीत आहे. लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न बघणारी अथिया जेव्हा तीन वर्षांची होती तेव्हा आरशासमोर अभिनय आणि डान्स करायची. पुढे शाळेत असताना ती थिएटरशी जोडली गेली. पुढे न्यूयॉर्कमध्ये तिने अॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान फिल्म मेकिंगवर तिने काम केले. अभिनय, एडिटिंग, डायरेक्शनचेही तिने शिक्षण घेतले. एका मुलाखतीत अथियाने सांगितले की, माझ्या मनात अभिनय बसलेला आहे. याबाबत मी खूप इमोशन आहे. मी सेटवर खूप मस्ती करीत असते. त्यामुळे चित्रपट मी आयुष्यभर करीत राहणार आहे. अथियाने हेदेखील सांगितले की, चित्रपटसृष्टीत मी लंबी पारी खेळण्यास प्रयत्नशील राहणार आहे. अथिया सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असून, इन्स्टाग्रामवर तिचे १.८ मिलियन फॉलोअर्स आहेत.