1 / 10दिल्लीतील एक ग्लॅमरस मॉडेल, जिने रॅप आणि आयटम सॉन्गमधून करिअरची सुरुवात केली होती. आता तिला आयुष्यभर तिहार जेलमध्ये राहावे लागणार आहे. रोहिणी कोर्टाने मॉडेल एंजल गुप्ता उर्फ शशिप्रभा हिला प्रियकर मंजीत सहरावत आणि अन्य आरोपींसोबत एका शिक्षक महिलेच्या खळबळजनक हत्येत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.2 / 10२९ ऑक्टोबर २०१८ साली दिल्लीच्या द्वारका भागात धक्कादायक घटना घडली होती. सोनीपत इथल्या एका प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनीता नेहमीप्रमाणे त्यांच्या शाळेत जात होत्या. परंतु दरियापूर पोलीस चौकीजवळ पोहचतात अचानक २ दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळीबारी सुरू केली आणि तिथून फरार झाले. हा दिवस सुनीता यांच्यासाठी खास होता कारण त्यादिवशी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते.3 / 10पोलिसांना ही ब्लाइंड मर्डर केस वाटत होती परंतु सुनीता यांच्या घरच्यांनी थेटपणे हत्येमागे सुनीताचा पती मंजीत सहरावत असल्याचा आरोप केला. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली आणि हळूहळू धागेदोरे जुळत गेले. तपासात पोलिसांच्या हाती सुनीताची खासगी डायरी लागली. त्यात तिने पतीच्या स्वभावाबाबत, भांडणांबाबत आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा उल्लेख केला होता.4 / 10त्याशिवाय सुनीताच्या डायरीत पती मंजीत तिच्या जीवाचं बरे वाईट करू शकतो असाही उल्लेख होता. डायरीतील या उल्लेखाने पोलिसांना स्पष्ट संकेत मिळाले की, ही सहज केलेली हत्या नाही तर त्यामागे मोठं षडयंत्र रचले असावे. त्यामुळे पोलिसांनी हत्येच्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली.5 / 10पोलिसांनी मंजीतचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा त्यात सातत्याने एका महिलेचे नाव पुढे आले. एंजल गुप्ता, २६ वर्षीय एंजल दिल्लीत मॉडेलिंगचं काम करत होती. मुंबईत आयटम सॉन्गही तिने शूट केले आहे. करिअरमध्ये मिळालेल्या ब्रेकनंतर तिने दिल्लीत परतण्याचा निर्णय घेतला होता. 6 / 10एंजल गुप्ता आणि मंजीत सहरावत या दोघांची भेट एका नाईट क्लबमध्ये झाली. क्लबच्या बाहेर उभी असलेली युवती कारची वाट पाहत होती. त्यावेळी तिला तिथून जाणाऱ्या दोघांनी त्रास देणे सुरू केले. त्यावेळी क्लबमधून बाहेर पडलेल्या व्यक्तीने त्या दोघांना फटकारले, त्यामुळे युवतीला छेडणारे दोघे पळून गेले. तिथेच या दोघांची पहिली ओळख झाली.7 / 10या दोघांमध्ये आधी मैत्री झाली त्यानंतर त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. कालांतराने या दोघांनी लग्न करण्याचं प्लॅनिंग केले होते. पोलिस तपासात सुनीताच्या हत्येचा कट आधी २५ ऑक्टोबर २०१८ रोजी करवा चौथच्या दिवशी रचला होता परंतु तो प्लॅन फसल्याचे उघड झाले.8 / 10अखेर २९ ऑक्टोबरला २ शूटरच्या मदतीने पुन्हा संधी मिळाली तेव्हा सुनीता यांची गोळ्या झाडून हत्या केली. मंजीत आणि एंजलने कथितपणे सुनीताच्या हत्येसाठी १० लाखांची सुपारी दिली होती. त्यातील पहिली रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आली होती. ज्याचा रेकॉर्ड पोलिसांना सापडला. इतकेच नाही तर सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशनही ठोस पुरावे पोलिसांना सापडले.9 / 10संपूर्ण तपास आणि पुराव्यानिशी पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले. त्यात रोहिणी कोर्टाने ७ वर्षाच्या सुनावणीनंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी मंजीत सहरावत आणि त्याची प्रेयसी एंजल गुप्ता यांना दोषी ठरवले. यात कोर्टाने हत्या आणि हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे10 / 10हे हत्याकांड सुनियोजित कट होता. आरोपीने खासगी इच्छा आणि अनैतिक संबंध जपण्यासाठी एका निर्दोष महिलेची हत्या केली. सुनीता एक शिक्षिका होती. समाजाला दिशा देणारी महिला होती. त्यामुळे गुन्हेगार कितीही शातीर असला तरी कायद्याच्या नजरेतून तो बचावू शकत नाही असा संदेश समाजाला जायला हवा असं कोर्टाने म्हटलं.