Join us

हुकूमशहा गद्दाफीसह कतरिनाचा फोटो

By admin | Updated: July 11, 2017 16:37 IST

लिबियाचे माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांच्यासोबतचा कतरिनाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11- अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे चांगलीच चर्चेत आहे. कतरिनाता तो व्हायरल फोटो पाहून सगळेच जण आश्चर्य व्यक्त करत आहे. लिबियाचे माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांच्यासोबतचा कतरिनाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कररिनाचा हा फोटो बॉलिवूडसह सर्वसामान्यांमध्ये सध्या चर्चेचा विषय आहे.
मॉडेल शमिता सिंघाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये गद्दाफीसोबत काही मॉ़डेल्सदेखील दिसत असून त्यामध्ये कतरिना कैफसुद्धा आहे. १५ वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे. या फोटोवर ‘एका फॅशन शोसाठी १५ वर्षांपूर्वी आपण सगळे लिबियात होतो आणि गद्दाफी यांना भेटायची संधी मिळाली. मुलींनो… तुम्हाला लक्षात आहे का?’असं कॅप्शन शमिताने दिलं आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री अदिती गोवित्रीकर, आंचल कुमार आणि नेहा धुपियासुद्धा आहेत.
आणखी वाचा
 

राजकारणाच्या नावाखाली फवाद खानचा बळी - रणबीर कपूर

सिनेमाच्या शूटिंगसाठी कपिलचं सेटवर बेशुद्धीचं नाटक?

दारु, सिगारेटमुळे भारताचा पाकविरोधात पराभव - राखी सावंत

गेल्या १५ वर्षांपूर्वी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीची फार दहशत होती. गद्दाफी आपल्यासोबत महिला सुरक्षारक्षकांचा एक गट ठेवत होते. महिला सुरक्षा रक्षकांच्या गटाला अॅमेझॉनियन्स’ असं म्हटलं जायचं. ४२ वर्षांपर्यंत लिबियावर राज्य करणारे गद्दाफी यांची 2011मध्ये विद्रोहींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हा फोटो पाहिल्यानंतर कतरिनाने अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी ‘जग्गा जासूस’ सिनेमाचं प्रमोशन करते आहे. तिला हा सिनेमा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. पण प्रमुख  कारण म्हणजे, बऱ्याच मोठ्या गॅपनंतर तिच्या आधीच्या प्रियकर रणबीर कपूरसोबत सिनेमात झळकते. . दरम्यान, कतरिना आणि रणबीरचा ‘जग्गा जासूस’ सिनेमा येत्या १४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचप्रमाणे आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमातही कतरिना दिसणार आहे.