Join us  

गुगलवर कोणत्याही चित्रपटाची नव्हे तर या वेबसिरिजची आहे चलती, लोक सर्च करतायेत या वेबसिरिजविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 6:00 AM

गुगलवर सध्या कोणत्या बॉलिवूड सेलिब्रेटी अथवा बॉलिवूड चित्रपटाची चलती नाहीये तर प्रेक्षक एका वेबसिरिजबाबत गुगलद्वारे जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहेत.

ठळक मुद्देही वेबसिरिज दुसरी कोणतीही नसून पाताल लोक आहे. ही वेबसिरिज लोकांना प्रचंड आवडत असून या वेबसिरिजची तुलना चक्क सेक्रेड गेम्ससोबत केली जात आहे

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे भारतात सगळीकडे लॉकडाऊन आहे. सध्या लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत. पण तरीही जास्त लोकांनी घराच्या बाहेर पडू नये अशी विनंती सरकारने केली आहे. त्यामुळे अनेकजण घरात राहूनच आपली कामं करत आहेत. अनेकजण सध्या सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काय करावे हे गुगलवर शोधत आहेत. पण त्याचसोबत गेल्या काही दिवसांत गुगलवर एका वेबसिरिजबद्दल सगळ्यात जास्त लोकांनी शोधले आहे.

गुगलवर सध्या कोणत्या बॉलिवूड सेलिब्रेटी अथवा बॉलिवूड चित्रपटाची चलती नाहीये तर प्रेक्षक एका वेबसिरिजबाबत गुगलद्वारे जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. ही वेबसिरिज दुसरी कोणतीही नसून पाताल लोक आहे. ही वेबसिरिज लोकांना प्रचंड आवडत असून या वेबसिरिजची तुलना चक्क सेक्रेड गेम्ससोबत केली जात आहे. या वेबसिरिजची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्याचसोबत या वेबसिरिजमधील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयची चर्चा रंगली आहे. मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकारांसोबतच सहकलाकारांच्या अभिनयाचे देखील कौतुक केले जात आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा ही पाताल लोक या वेबसिरिजची निर्माती आहे. ही वेबसिरिज लोकांना आवडण्यासोबतच वादात देखील अडकली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पाताल लोक या वेबसीरिजवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरली होती. त्यानंतर लॉयर्स गिल्डचे सदस्य वीरेन सिंग गुरुंग यांनी या सीरिजसंदर्भात अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठवली होती. वेबसीरिजमध्ये जाती सूचक शब्दांचा वापर केला असल्याचा आरोप त्यांनी या नोटीसमध्ये केला होता. यानंतर भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी पाताल लोक प्रकरणी अनुष्काविरोधात तक्रार दाखल केली होती. गुर्जर यांनी अनुष्कावर अनेक गंभीर आरोप केले होते. या सगळ्यामुळेच लोकांना या वेबसिरिजबद्दल जाणून घेण्यात अधिक रस आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.

टॅग्स :पाताल लोक