Join us  

भटजींनी चक्क नवरदेवाचं नाव चुकवलं..., अलाना पांडेच्या लग्नाचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 3:44 PM

Alanna Panday Ivor MacCray Wedding: लग्न म्हटलं की गमतीजमती आल्याच. नुकतंच अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण अलानाचं लग्न पार पडलं. या लग्नातील हा व्हिडीओ फारच मजेशीर आहे.

 Alanna Panday Ivor MacCray Wedding: चंकी पांडेची पुतणी आणि अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे नुकतीच लग्नबंधनात अडकली. बाॅयफ्रेन्ड Ivor McCrayसोबत तिनं लग्नगाठ बांधली. अगदी थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एक व्हिडीओ चांगलाच मजेशीर आहे. होय, तो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

होय, लग्नात भटजी मंत्रोच्चार करताना नवरदेवाचं नाव चुकीचं घेतात आणि नवरी नवरदेवासह सगळेच हसायला लागतात.

 ‘वेडिंग डिझायनर्स द ए-क्यूब प्रोजेक्ट’ने इंस्टाग्रामवर अलाना आणि आयव्हरच्या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये, भटजी “आपण इथे अलाना आणि इंदरच्या लग्नासाठी जमलो आहोत” असे म्हणतात आणि लग्नविधींना सुरूवात करतात. आयव्हरला भटजी इंदर म्हणतात आणि त्यांच्या तोंडचा हा उल्लेख ऐकून सगळेच उपस्थित हसू लागतात.  नवरदेव-नवरीला देखील हसू आवरत नाही.  अलानाची आई भटजींना नवरदेवाचं नाव Ivor असल्याचं सांगतात. तेव्हा कुठे भटजी ते नाव घेत विधी पूर्ण करतात.

अलाना ही चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेची मुलगी आहे. अलाना सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करणा-या अलानाचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. बॉलिवूडमध्ये नसली तरी अलाना ग्लॅमर वर्ल्डचा भाग आहे. शाहरूखची मुलगी सुहाना खान हिच्याशी तिची घट्ट मैत्री आहे. संवेदनशील स्वभावाच्या अलानाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं आणि झोपणं प्रचंड आवडतं. अनेकदा ती 14-14 तास झोपते. अलाना मॉडेल व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. तर तिचा पती आयव्हर हा फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर आहे.  

टॅग्स :अनन्या पांडेचंकी पांडेबॉलिवूड