Join us  

Hollywoodच्या अभिनेत्रीने पार केल्या बोल्डनेसच्या मर्यादा, शेअर केला थेट बाथटबमधला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 3:37 PM

अभिनेत्रीने शेअर केलेला तिचा लेटेस्ट फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

भारतात जन्मलेली सुपरमॉडेल, अ‍ॅक्ट्रेस, टीव्ही होस्ट पद्मा लक्ष्मी (Padma Lakshmi) तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. ती अनेकदा तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिचा आणखी एक फोटो शेअर केला आहे जो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री न्यूड आहे (Padma Lakshmi Nude photoshoot)) आणि बाथटबमध्ये पोझ देत आहे.

पद्मा लक्ष्मीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती तांब्याच्या बाथटबमध्ये दिसते आहे. या फोटोत तिची सेक्सी टोन्ड फिगर फ्लॉन्ट करतेय. आहे. अभिनेत्रीच्या स्मोकिंग हॉट फोटोवरून नजर हटवणे चाहत्यांना कठीण जात आहे. पोस्ट शेअर करताना मॉडेलने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आजपासून तीन वर्षांपूर्वी."

पद्मा लक्ष्मी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. लक्ष्मीचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता. ती न्यूयॉर्कमधील तिची आई आणि चेन्नईमध्ये तिच्या आजी-आजोबांकडे  मोठी झाली.

2003मध्ये प्रदर्शित ‘बूम’ या सिनेमात पद्मा लक्ष्मी कतरिना कैफसोबत दिसली होती. पण मॉडेलिंगमध्ये जागतिक स्तरावर कीर्ती मिळवलेल्या पद्मालक्ष्मीला अभिनय क्षेत्रात टीकाव लागला नाही. ‘बूम’ आपटला आणि हा सिनेमा आपटल्यानंतर अमेरिकेला परत जाऊन पद्मालक्ष्मीने टीव्ही शोवर लक्ष केंद्रीत केले.

प्रसिद्ध लेखिका अशीही तिची ओळख आहे. 2004 मध्ये लक्ष्मीने लेखक सलमान रश्दी यांच्यासोबत विवाह थाटला. त्यावेळी रश्दी 51 वर्षांचे होते तर लक्ष्मी केवळ 28 वर्षांची होती. पण त्याचे नाते फार काळ टिकू शकले नाही. 2007मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :पद्मा लक्ष्मीसेलिब्रिटी