Join us  

माझ्या शरीराचं काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त मला - झरीन खानची टीकाकारांना चपराक

By admin | Published: April 05, 2016 2:39 PM

जाडेपणावरून चिडवणा-यांना अभिनेत्री झरीन खानने एका पोस्टद्वारे सणसणीत चपराक लगावली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - सलमान सोबत 'वीर' चित्रपटातून बॉलिवूड आणि नुकत्याच आलेल्या 'हेट स्टोरी ३' मधील बोल्ड भूमिकेमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री झरीन ही एकेकाळी खूप जाडी होती. मात्र अथक परिश्रमांनंतर तिने आत्ताची फिगर कमावली आहे. झरीनने सोशल मीडियावर तिच्या लहानपणीचे काही फोटो पोस्ट केले असून त्यासोबतच तिच्या जाडेपणाबद्दल चिडवणा-यांना एक सणसणीत चपराक लगावणारी पोस्टही लिहीली आहे. 
' मी ९वी व १२वीत असतानाचे हे काही फोटो.. आता इतक्या काळानंतर हे फोचा पाहिल्यानंतर मला माझा खूप अभिमान वाटतो. याचा अर्थ असा नव्हे की तेव्हाच्या माझ्या स्थितीबद्दल (जाडेपणाबद्दल) मला लाज वाटते. त्याकाळी खूप जाडी असतानाही मी लोकांचे टोमणे मनावर घेतले नाहीत. कारण हे माझं वैयक्तिक आयुष्य आणि माझं शरीर असून, माझ्या शरीराचं काय करायचं हे ठरवण्याचा अधिकारही फक्त मलाच आहे' असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 
'दुर्दैवाने लहानपणी मला माझ्या वजनावरून प्रचंड चिडवण्यात आलं, पण मी लोकांच्या बोलण्याचा माझ्यावर परिणाम होऊ दिला नाही आणि यापुढेही होऊ देणार नाही. फिटेनस मिळवण्यासाठी मी परिश्रम केले आहेत. मी बराच लांबचा पल्ला गाठला आहे आणि मला (या मार्गावर) अजूनही पुढे जायचं आहे. पण हे सगळं मी करत आहे याचं कारण फक्त मीच आहे. लोकांनी माझ्यावर टीका केल्यामुळे नव्हे तर मला असं करावसं वाटलं म्हणूनच मी हे परिश्रम केले' अशा शब्दांत तिने टीकाकारांना फटकारले आहे.