कन्नूर : आजकाल विजेचा वापर एवढा वाढला आहे की, विजेचे बिल प्रचंड येते. पण, केरळात कन्नूर जिल्ह्यात असे घर तयार केले आहे ज्याला फक्त चार युनिट वीज लागते. हरी आणि आशा या दाम्पत्याने हे पर्यावरणपूरक घर तयार केले आहे. हे दाम्पत्य पर्यावरण क्षेत्रात काम करते. त्यांचे घर निसर्गाच्या सानिध्यात आहे. हरी यांच्या मित्राने घराची रचना तयार केली. घराच्या भिंती मातीच्या आहेत. छत काँक्रिटचे आहे. यावर टाइल्स बसविल्या आहेत. पावसाच्या पाण्याने घर गळू नये म्हणून काँक्रिटचे छत केल्याचे ते सांगतात. या घराच्या रचनेमुळे कितीही तापमानात येथे थंड वातावरण असते. घरात केवळ एक ते दोन ठिकाणीच विजेचे पॉइंट दिलेले आहेत. या घराची रचनाच अशी केली आहे की, नैसर्गिक उजेड अधिक येईल.घरात नैसर्गिक फ्रिजही तयार करण्यात आला आहे. त्यांनी किचनमध्ये एक खड्डा खोदला असून चारही बाजूंनी विटा आहेत. आतून माती आणि बाजूने वाळूही आहे. त्यामुळे यात अन्नपदार्थ चांगले राहतात. घरात सोलर पॅनल आणि बायोगॅसचा वापर होतो.
या घरासाठी लागते फक्त चार युनिट वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 07:25 IST