Join us  

साऊथचा सुपरस्टार श्रीनिवास बेल्लमकोंडासोबत नुसरत भरुचा करणार स्क्रीन शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 3:30 PM

एस. एस. राजामौली आणि प्रभास यांच्या २००५ मध्ये रिलीज झालेल्या 'छत्रपती' या चित्रपटाच्या रिमेकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

एस. एस. राजामौली आणि प्रभास यांच्या २००५ मध्ये रिलीज झालेल्या 'छत्रपती' या चित्रपटाच्या रिमेकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. श्रीनिवास बेल्लमकोंडा या चित्रपटात टायटल रोल साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याची नायिका कोण बनणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. याचं उत्तर आता मिळालं आहे. श्रीनिवाससोबत नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

छत्रपती या चित्रपटाच्या निमित्ताने श्रीनिवास हिंदीत एंट्री करणार आहे. एका नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. यात नुसरत यापूर्वी कधीही न पाहिलेल्या रूपात दिसणार असल्याचे समजते. नुसरत भरुचा म्हणाली की, हा माझा पहिला पॅन इंडिया अॅक्शन ड्रामा असल्याने खूप उत्साहित आहे. कुशल तंत्रज्ञांच्या टीमसोबत आणि को-स्टार श्रीनिवाससोबत काम करण्याची संधी मिळाल्यानं मी खूप रोमांचित आहे. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक व्हि. व्हि. विनायक आहेत.

नुसरत भरुचाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भरूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.

टॅग्स :नुसरत भारूचाप्रभास