रोडीज बनण्याची इच्छा असणा:या एका तरूणाने शुक्रवारी त्याच्या टि¦टर हँडलवर या शोची जज असलेल्या ईशा देओलला एक खुले आव्हान दिले. ईशा पहिल्यांदाच या शोची जज बनली आहे. या मुलाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, तो स्केटबोर्डवर ऑडीशन देण्यासाठी पुण्याला येत आहे, ईशामध्ये हिंमत असेल तरच तिने त्याला बोलावे नाहीतर मान खाली घालून गप्प बसावे. या मुलाने ईशाबद्दल काही अपशब्दही काढले. पहिल्या राऊंडच्या ग्रुप डिक्सशन बाबत बोलताना ईशाने सांगितले की, या प्रकरणामुळे प्रत्येक त:हेच्या एक्सायमेंटबाबत समजते. मी खरंच या माणसाची स्केटबोर्डची वाट पाहत होते. पण मी त्याला गर्दीत ओळखू शकले नाही. ट्विटरवर प्रत्येकालाच त्यांचे म्हणणो मांडण्याचा अधिकार आहे, पण या व्यक्तीने सीमा सोडली आहे. मी धर्मेंद्रची मुलगी आहे, कोणालाही घाबरत नाही.’