Join us

माङयामुळे कोणताही चित्रपट हिट

By admin | Updated: September 30, 2014 00:21 IST

कोणत्याही चित्रपटात मी भूमिका केल्यास तो चित्रपट सुपरहिटच ठरतो, असे बॉलीवूडचा ‘किंगखान’ शाहरुखचे म्हणणो आहे.

कोणत्याही चित्रपटात मी भूमिका केल्यास तो चित्रपट सुपरहिटच ठरतो, असे बॉलीवूडचा ‘किंगखान’ शाहरुखचे म्हणणो आहे. शाहरुखने आपल्या दोन दशकाच्या कारकीर्दीत मसाला चित्रपटांसह काही कलात्मक व वेगळी दृष्टी असणा:या चित्रपटातही कामे केली आहेत. माङया हजेरीमुळे एखादा सामान्य चित्रपटदेखील भरमसाठ पैसे कमावतो. ‘चक दे इंडिया’चे उदाहरण याबाबत बोलके आहे. मसालापट नसतानाही या चित्रपटाने मोठी कमाई केली. कारकीर्दीतील हा सर्वात यशस्वी चित्रपट असल्याचे मी समजतो, असे शाहरुखने स्पष्ट केले. बाजीगर, स्वदेश, डर, यह हैं इंडिया, माया मेमसाब या चित्रपटात माङया हटके भूमिका होत्या. वेगळ्या धाटणीचे मी केलेले चित्रपटही हिट होतात, असेही शाहरुख म्हणाला.