Join us  

निशिगंधा वाड यांचा तिसऱ्यांदा पीएचडी करण्याचा मानस

By admin | Published: October 30, 2016 1:18 AM

शिक्षणाला वयाचे बंधन नसते. प्रत्येक व्यक्ती कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकतो. अशी शिकण्याची जिद्द प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री निशिगंधा वाड यांनादेखील आहे

शिक्षणाला वयाचे बंधन नसते. प्रत्येक व्यक्ती कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकतो. अशी शिकण्याची जिद्द प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री निशिगंधा वाड यांनादेखील आहे. निशिगंधा यांचा तिसऱ्यांदा पीएचडी करण्याचा मानस असल्याचे त्यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. निशिगंधा म्हणाल्या, ‘‘२०१९ पर्यंत शांताबाई शेळके यांच्या स्वतंत्र कवितांवरच्या ग्रंथावर मला पीएचडी पूर्ण करायची आहे. यापूर्वीदेखील मी २००३ मध्ये इतिहास तर २०१३ मध्ये महिला सक्षमीकरण या विषयात पीएचडी पूर्ण केली आहे. खरे सांगू का, मी दहावीला बोर्डात पहिल्या पन्नासमध्ये होते, तर बारावीमध्ये बोर्डात मी तिसरी आली होते.’’ माझी मुलगी ईश्वरीलादेखील दहावीला ९४ टक्के गुण होते. योग्य पद्धतीने मुलांना आपण विचार करण्यास प्रेरक ठरलो आहोत, याचा अधिक अभिमान वाटतो. तसेच हल्ली शिक्षणाची व्याख्या बदलली आहे. कारण आजचे शिक्षण हे पुस्तकी ज्ञानावर नसते. तर हल्लीची मुले ही थेट कामाचा अनुभव घेत असतात. त्यामुळे या मुलांविषयीदेखील कौतुक वाटते. निशिगंधा यांनी शेजारी शेजारी, एकापेक्षा एक, वाजवा रे वाजवा, सासर-माहेर अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.