Join us  

या अभिनेत्रीची करण्यात येते देवासारखी पूजाअर्चा, तिच्या नावाने बांधण्यात आले मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 3:48 PM

लाडक्या कलाकाराला मंदिरात ठेवून पूजा करण्याची किमयासुद्धा या दक्षिणेकडील रसिकांनी साधली आहे.

कलाकार रसिकांचे मनोरंजन करतात. आपल्या अभिनयानने ते रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवतात. रसिक आपल्या लाडक्या कलाकारावर जीव ओवाळून टाकायलाही तयार असतात. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक झलक पाहायला मिळावी यासाठी रसिक तासनतास या कलाकारांच्या घराबाहेर उभे असतात. लाडक्या कलाकाराचे सिनेमा एकदा दोनदा नाही तर शेकडो वेळा थिएटरमध्ये पाहणारे रसिकही विरळच. भारतात अशा कलाकार वेड्या रसिकांची कमतरता नाही. दक्षिणेकडे तर रसिक कलाकारांची अगदी देवासारखी पूजा करतात हे तर सा-यांनाच माहिती. मात्र लाडक्या कलाकाराला मंदिरात ठेवून पूजा करण्याची किमयासुद्धा या दक्षिणेकडील रसिकांनी साधली आहे. 

दक्षिणेत अभिनेता-अभिनेत्रींची लोक देवाप्रमाणे पूजा करतात, यात आणखी एका अभिनेत्रीचे नाव शामिल झाले आहे. एखाद्या मंदिरात अभिनेत्रीची मुर्ती बसवणे हे खरंच हैराण करणारे असले तरी चाहते त्या अभिनेत्रीची मनोभावे पुजा करतात. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून निधी अग्रवाल आहे.निधीने फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूड सिनेमांतही ती झळकली आहे. त्यापैकी मुन्ना मायकल हा तिचा हिंदी मधला गाजलेला सिनेमा.

बॉलिवूडमध्ये मुन्ना मायकल सिनेमामुळेच तिची वेगळी ओळख निर्माण झाली. बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत निधी प्रचंड प्रसिद्ध आहे, निधीचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्याने चक्क व्हेलेंटाईने डेच्या दिवशी निधी अग्रवालची प्रतिमा बनवत मंदिरात स्थापना केली. देवीप्रमाणे रोज निधीच्या प्रतिमेची मंदिरात पुजाअर्चा केली जाते.

निदी अग्रवाललासुध्दा तिच्या नावाने मंदिर असल्याचे कळताच मोठा धक्काच बसला होता. कारण निधीने गेल्या काही वर्षापांसूनच तिच्या करिअरला सुरुवात केली आहे. करिअरच्या सुरुवातीला चाहत्यांचे इतकं प्रेम मिळत असल्याचे जाणून तिने सुद्धा आश्चर्यव्यक्त केले होते.अल्पावधीतच निधीला दाक्षिणात्य रसिकांची पसंती मिळाली. 

निधीने २०१७मध्ये अभिनय करिअरला सुरुवात केली होती. तिने बॉलिवूडमधील ‘मुन्ना माइकल’ या सिनेमात काम केले. त्यानंतर तिने २०१८ आणि २०१९मध्ये काही तेलुगू सिनेमांमध्येही काम केले. ज्यामध्ये ‘सव्यसाची’, ‘मिस्टर मजनू’, ‘आईस्मार्ट शंकर’ या सिनेमांचा समावेश आहे. आता निधीचे ‘भूमि’ आणि ‘पूनगोडी’ हे तामिळ सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

टॅग्स :निधी अग्रवाल