Join us  

Nia Sharma ने हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल, गोव्यात सध्या करत आहे एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 5:58 PM

टीव्ही इंडस्ट्रीतील फेमस अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) सोशल मीडियावर फार अॅक्टिव असते आणि ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.

निया शर्मा (Nia Sharma) टीव्ही विश्वातील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर लाखो कमेंट्स येतात. नियाला तिच्या अभिनयासाठी ओळखलं जातं, पण ती नेहमी तिच्या बोल्ड फोटोंमुळे जास्त चर्चेत असते. तिने पुन्हा एकदा आपल्या फॅन्सना सरप्राइज दिलं आहे आणि हॉट फोटो शेअर केले आहेत.

टीव्ही इंडस्ट्रीतील फेमस अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) सोशल मीडियावर फार अ‍ॅक्टिव असते आणि ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. निया फॅन्समध्ये आपल्या वेगळ्या अंदाजासाठी आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच तिचं 'गरबे की रात' हे गाणं रिलीज झालं होतं. निया शर्मा सध्या गोव्यात एन्जॉय करत आहे. इथले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात ती फार ग्लॅमरस दिसत आहे.

निया शर्माने आपल्या आपले हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनला तिने लिहिलं की, 'I am ‘Necessary Evi'. यात ती स्कीन कलरचा टॉप घालून दिसते आणि तिच्यावर सूर्याची किरणे पडताना दिसत आहे. नियाच्या फोटो फोटोवर तिचे फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. 

निया शर्मा (Nia Sharma) च्या वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर तिने मालिका 'काली'मधून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. नियाला टीव्हीवर लोकप्रियता 'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकेने अधिक मिळाली. त्यानंतर झी टीव्हीच्या 'जमाई राजा'तून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. ती खतरों के खिलाडी ची विनरही राहिली आहे. 

टॅग्स :निया शर्मासेलिब्रिटीटेलिव्हिजन