Join us

'आई कुठे काय करते'मध्ये अनिरुद्धचे खरे रंग पुन्हा आले समोर, अभीचा वापर करून अरुंधतीविरोधात करतोय कारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 15:04 IST

आशुतोष अपघातातून आता बरा होतोय हे पाहून अरुंधती सध्या आनंदात आहे. पण तिचा हा आनंद काही अनिरुद्ध बघवत नाहीय. तो पुन्हा आपले खरे रंग दाखवायला सुरुवात करतोय.

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट आला आहे. आतापर्यंत प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळणारा आशुतोष आता अपघातच्या धक्क्यातूवन बरा होतोय.  त्यामुळे सध्या अरुंधती आनंदात आहे. पण तिचा हा आनंद काही अनिरुद्ध बघवत नाहीय. आशुतोष रुग्णालयात मृत्यूशी लढा देत असताना जो अनिरुद्ध  तिला आशुतोषसोबत लग्न कर असा सल्ला देतो. तोच तिच्या अनंदावर विरजण घालण्याचे प्रयत्न करतोय.

अनिरुद्ध अरुंधती विरोधात प्लान करण्यासाठी अभिचा वापर करतो. अभी सुरुवातीपासून अनिरुद्धच्या बाजूने आहे याचाच फायदा अनिरुद्ध घेण्याचे ठरवतो. तो अनिरुद्धला अरुंधती विरोधात भडकवण्याचे काम करतो. अनिरुद्ध पुन्हा एकदा अरुंधतीचे पाय खेचताना दिसणार आहे. 

नुकताच  सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. यात अभी अनघाशी आपण फक्त मित्र आहोत या वाक्यावर विश्वास नसल्याचं बोलताना दिसतोय. तर अरुंधती यशला माझ्यासाठी माझी मैत्री महत्त्वाची आहे तुमच्या प्रश्नांना मी बांधील आहे त्याची उत्तर मी देईन असं सांगताना दिसतेय. तर अनिरुद्ध अभिला अरुंधतीकडून आपली काहीच अपेक्षा नसल्याचं सांगताना दिसतोय. तर अभी अनिरुद्धला मिठी मारुन बाबा तुम्ही काळजी नका करु असा सल्ला देताना दिसतोय. अभी हुक्कामाचा एक्का असून तो असे पर्यंत आपण डाव हरु शकत नाही असं अनिरुद्ध म्हणतोय. अभीला हाताशी घेऊन अनिरुद्ध नेमका अरुंधती विरोधात काय प्लान करतोय?, तो करत असलेल्या प्लानमध्ये तो यशस्वी होईल का?, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका