Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीची तब्येत खालावली, आता काय होणार पुढे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 16:53 IST

अभीने अंकिताशी लग्न केल्यामुळे अरुंधतीच्या डोक्याला ताप झालाय. त्यामुळे आता अरुंधतीची तब्येत खालावली आहे. 

ठळक मुद्देअंकिता देशमुखांच्या घरात आल्यापासून ती सतत अनिरुध्द आणि अरुंधतीच्या घटफोस्टाचा विषय काढतेय. अरुंधतीला घरातून लवकर बाहेर काढण्याचा अंकिताचा डाव आहे.

‘आई कुठे काय करते’ या सिरीअलमध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळत आहेत. अभीने अंकिताशी लग्न केल्यामुळे अरुंधतीच्या डोक्याला ताप झालाय. त्यामुळे आता अरुंधतीची तब्येत खालावली आहे. 

अंकिता देशमुखांच्या घरात आल्यापासून ती सतत अनिरुध्द आणि अरुंधतीच्या घटफोस्टाचा विषय काढतेय. अरुंधतीला घरातून लवकर बाहेर काढण्याचा अंकिताचा डाव आहे. पण अभी अंकिताला ठणकावून सांगतो की, आई कुठेही जाणार नाही. तसंच  आप्पादेखील सगळ्यांसमोर स्पष्ट करतात की, अरुंधतीने या घरातून जावू नये असं मला वाटतं. कारण मी माझ्या वाटणीचा हिस्सा अरुंधतीच्या नावावर केला आहे. त्यामुळे माझ्यानंतर सुद्धा अरुंधती ही देशमुखांच्या घराचा एक भाग असणार आहे आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अरुंधतीचा देशमुखांच्या घरावरचा ठसा या जन्मात तरी जाणार नाही.

अभी-अंकिताच्या लग्नाच्यानिमित्ताने घरात सत्य नारायणाची पूजा असते आणि या पूजेच्यादिवशीच घरात हा वाद रंगतो.  अरुंधती तर घटस्फोटानंतर तिच्या माहेरी जावून राहायला तयार आहे. पण आप्पा, आजी आणि तिची तिन्ही मुलं अरुंधतीला काही सोडायला तयार नाहीयेत.

अरुंधती तर दिवसेंदिवस खचत चालली आहे. मुलांचे टेन्शन काही संपत नाहीये. पण आजवर अरुंधतीने अनेक वादाळांचा सामना केला आहे. त्यामुळे अभी अंकिताच्या लग्नावरून घरात सुरू असलेला कलह ती लवकरच थांबवेल आणि अंकिताचं पितळ देखील उघड करेल यात काही शंका नाही.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका