Join us

रईस, रंगूनसहीत 6 सिनेमांचे नवीन पोस्टर रिलीज

By admin | Updated: January 2, 2017 12:54 IST

नवीन वर्षांच्या सुरुवातीला बॉक्सऑफिसवर रिलीज होणा-या बॉलिवूडमधील आगामी 6 सिनेमांचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 2 - नवीन वर्षांच्या सुरुवातीला बॉक्सऑफिसवर रिलीज होणा-या बॉलिवूडमधील आगामी 6 सिनेमांचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. यामुळे यंदा सिनेरसिकांसाठी भरपूर एंटरटेन्मेंट, एंटरटेन्मेंट आणि एंटरटेन्मेंट असणार आहे. रईस, रंगून, टॉयलेट एक प्रेम कथा, जॉली एलएलबी 2, रजनीकांत आणि अक्षय कुमारचा 2.0 आणि पॅडमॅन अशा वेगळ्या धाटणीच्या सिनेमांची मेजवानी नवीन वर्षांत सिनेरसिकांसाठी असणार आहे.  
 
जानेवारी महिन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणा-या 'रईस' सिनेमाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. या सिनेमामध्ये शाहरुख आणि माहिरा एकत्र दिसत आहेत.  'तू शमा है तो याद रखना... मै भी हूँ परवाना...' असा डायलॉग 'रईस'च्या नव्या पोस्टरसोबत शेअर करण्यात आला आहे. 25 जानेवारी रोजी हा सिनेमा सिनेमागृहात दाखल होणार आहे.
 

शाहिद कपूरने 'रंगून' या आपल्या आगामी सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टवर लव (प्रेम), वॉर (युद्ध) आणि डिसिट (विश्वासघात) असे शब्दही दिसत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर 6 जानेवारीला रिलीज करण्यात येणार आहे. विशाल भारद्वाज सिनेमाचे निर्माते असून शाहिद कपूर, कंगना राणावत आणि सैफ अली खान यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा 24 फेब्रुवारी रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

अक्षय कुमारने त्याच्या चार सिनेमांचे पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला 2.0 सिनेमा नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'हे जग केवळ माणसांसाठी नाही' अशी टॅगलाईन या सिनेमा आहे.

2.0 #2017 pic.twitter.com/Yn2KIxII4I

तर दुसरीकडे 'जॉली एलएलबी 2'चेही पोस्टर शेअर करण्यात आले आहे. अरशद वारसीची मुख्य भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी' सिनेमाचा हा सिक्वेल आहे. आता या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अक्षय कुमारचा आणखी एक सिनेमा 'टॉयलेट एक प्रेमकथा' या सिनेमाचेही नवे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे.

सत्य घटनेवर आधारित असणा-या 'पॅडमॅन' हा सिनेमा ट्विंकल खन्नाच्या मिस फनी बोन्स प्रोडक्शनचा आहे. या प्रोडक्शनचा हा पहिला सिनेमा असून ट्विंकल खन्नाचा पती खिलाडी अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक आर. बल्की आहेत.

शिवाय, बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि अभिनेता धनुष यांच्या 'वेलई इल्ला पट्टाथरी' अर्थात ‘व्हीआयपी 2’ या सिनेमाचे पहिले पोस्टरही रिलीज झाले आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्याने ट्विटवर चित्रपटाचं पोस्टर रिलीज केले. सौंदर्याने सिनेमाचे दोन पोस्टर शेअर केले आहेत. एका पोस्टरमध्ये धनुष चहाच्या टपरीवर हातात सायकलवर दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये धनुष आणि काजोल समोरासमोर उभे आहेत.