Join us

सुखविंदरसिंग यांच्या अभिनयाची नवी इनिंग

By admin | Updated: December 17, 2015 01:43 IST

आपल्या बुलंद आवाजाच्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात गायक सुखविंदरसिंग यांच्या अभिनयाची नवी इनिंग लवकरच पाहायला मिळणार आहे.

आपल्या बुलंद आवाजाच्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात गायक सुखविंदरसिंग यांच्या अभिनयाची नवी इनिंग लवकरच पाहायला मिळणार आहे. राठौड फिल्म्स प्रॉडक्शनच्या आगामी ‘लॉर्ड आॅफ शिंगणापूर’ या मराठी चित्रपटात त्यांचे हे वेगळं रूप पाहता येणार आहे. सुखविंदरसिंग यांनी गायलेल्या ‘देवा शनिदेवा’ या गीतावर ते स्वत: परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत.सूफी गायकीमध्ये देवासमोर आपली कला सादर करताना पायात घुंगरू बांधून ‘अल्ता’ लावण्याची प्रथा आहे. या गाण्यातही ही प्रथा पाळली आहे. या गाण्यासाठी खास काठेवाडी पोशाख सुखविंदरसिंग यांनी परिधान केला आहे.शनिमहात्म्यावर आधारित या चित्रपटात गायनाबरोबर परफॉर्मन्स करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी निश्चितच आनंददायी होती, असं सांगत शनिदेवाच्या आराधनेचे हे गीत प्रत्येकाच्या मनाला भिडेल, दैवी प्रचितीचा अनुभव देणारा हा चित्रपट माझ्यासाठी जसा खास आहे, तसा तो प्रेक्षकांसाठीही असेल, अशी आशा सुखविंदरसिंग व्यक्त करतात. फारूख बरेलवी यांनी लिहिलेल्या या गीताला फरहान शेख यांनी संगीत दिले आहे.निर्माता-दिग्दर्शक राज राठौड यांनी ‘लॉर्ड आॅफ शिंगणापूर’ या शनिमहात्म्यावर आधारित चित्रपटातून शनिदेवाचे एक वेगळे सकारात्मक रूप भक्तांच्या समोर आणले आहे. या चित्रपटात शनिदेवाची भूमिका अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी साकारली असून, सुधीर दळवी, मनोज जोशी, वर्षा उसगावकर, राहुल महाजन, आशुतोष कुलकर्णी, पंकज विष्णू, अनिकेत केळकर, मिलिंद जोशी, दीपक शर्मा, कांचन पगारे, वैभवी, ब्रिजेश हिरजी, यशोधन राणा, यश चौहान, वैभव बागडे, सागर पंचाल, शिशी गिरी, मनमौजी, आकाश भारद्वाज, अ‍ॅण्ड्रीया अशी कलाकारांची तगडी फौज यात आहे.