दि ग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने मुख्य भूमिका साकारली आहे. तो म्हणतो, की मराठा लढवय्या पेशवा बाजीराव यांच्या कथेला लोक कसा प्रतिसाद देतील, याविषयी मी खूपच नर्व्हस आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासोबत शाहरुख खानचा चित्रपट ‘दिलवाले’ही रिलीज होणार असून, बॉक्स आॅफीसवर चांगलीच टक्कर होणार आहे. पुढे बोलताना रणवीर सिंग म्हणाला, की बाजीरावला पाहताना लोक कसा प्रतिसाद देतील याबद्दल मला नर्व्हस वाटते आहे. १२-१५ वर्षांपासून या चित्रपटावर संजय लीला भन्साळी काम करीत आहेत. खूप परिश्रम, रक्त, घाम यातून गेला आहे. आम्ही एकत्र सर्वांनी मिळून चित्रपटासाठी काम केले आहे. पे्रक्षक कसे रिअॅक्ट करतील, याबद्दल मला अस्वस्थता वाटते आहे. आम्ही काहीतरी अविस्मरणीय देण्याचा प्रयत्न करतो आहोत़ असे काहीतरी जे प्रेक्षकांना पाहायला आवडेल. आमची बाजीराव मस्तानीची टीम पे्रक्षक कसे रिअॅक्ट करतील यासाठी नर्व्हस आहे.
नर्व्हस झाला रणवीर
By admin | Updated: November 8, 2015 02:37 IST