Join us  

ना शाहरुख, ना रणबीर, ना प्रभास! कोरोनात 'या' अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर कमावले ३००० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 4:58 PM

बॉलिवूडच्या या स्टारने कोरोना महामारीनंतर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट दिले आहेत.

२०२० नंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला कोरोना महामारीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. चित्रपटांची शूटिंग बंद पडली आणि चित्रपटगृहेही बंद करावी लागली. मात्र, आता परिस्थिती पूर्वीसारखी सामान्य झाली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका स्टारबद्दल सांगणार आहोत ज्याने कोरोना महामारीनंतर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट दिले आहेत. तो शाहरुख खान (Shah Rukh Khan) किंवा रजनीकांत (Rajinikanth) नाही. त्याचे नाव आहे संजय दत्त (Sanjay Dutt). 

२०२० नंतर संजय दत्तने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, तो रुपेरी पडद्यावर सहाय्यक किंवा नकारात्मक भूमिकांमध्ये दिसला. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'KGF Chapter 2' मध्ये त्याने खलनायक अधीराची भूमिका केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. सुपरस्टार यशच्या या चित्रपटाने जगभरात १२०० कोटींचा व्यवसाय केला होता.

या चित्रपटांमध्ये संजय दत्तने केले होते कामयानंतर संजय दत्तचे 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'शमशेरा' चित्रपटगृहात गाजले. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर १५४ कोटींची कमाई केली. २०२३ मध्ये संजय दत्तने सुपरस्टार थलपथी विजयच्या 'लिओ' चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने जगभरात ६०७ कोटींचा व्यवसाय केला.

शेवटच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली १००० कोटींहून जास्त कमाईसंजय दत्तने २०२२ मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या 'जवान'मध्येही काम केले होते. मात्र, या चित्रपटात त्याचा फक्त एक कॅमिओ होता. रिलीजनंतर या सिनेमाने जगभरात ११५० कोटींचा व्यवसाय केला होता. या सर्व चित्रपटांच्या कलेक्शनची आकडेवारी जोडली तर ती ३००० कोटींहून अधिक आहे.

संजय दत्त प्रभास आणि थलपती विजयवर पडली भारीआता शाहरुख खानबद्दल बोलायचं झालं, २०२३ मध्ये त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'ने बॉक्स ऑफिसवर २६०० रुपयांहून अधिकचा व्यवसाय केला आहे. रणबीर कपूरच्या 'शमशेरा', 'ब्रह्मास्त्र', 'तू झुठी में मक्कर' आणि 'अॅनिमल' सारख्या चित्रपटांनी १६०० कोटींची कमाई केली. त्याचबरोबर प्रभासच्या 'राधेश्याम', 'आदिपुरुष' आणि 'सालार'चे एकूण कलेक्शन १३०० कोटी रुपये आहे. थलपथी विजयच्या 'मास्टर', 'बिजिल', 'वारीसू' आणि 'लिओ'ने १४०० कोटींचा व्यवसाय केला आहे. अशाप्रकारे, कोरोना महामारीनंतर बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत संजय दत्तने या सर्व स्टार्सना मागे टाकले आहे.

टॅग्स :संजय दत्तशाहरुख खानसलमान खानप्रभास