Join us  

किस्सा KISS चा! CUT म्हटल्यावरही थांबली नाही नरगिस, इम्रान हाश्मीला करत राहिली किस, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 4:26 PM

नरगिस (Nargis Fakhri) या सिनेमात बॉलिवूडचा 'सीरिअल किसर' इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) सोबत दिसली होती. सिनेमात दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती.

'रॉकस्टार' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी नरगिस फाखरी (Nargis Fakhri) गेल्या काही वर्षांपासून सिनेमापासून दूर आहे. मात्र, ती आपल्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच फॅन्ससाठी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नरगिस तशी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होती. पण तिचा एक 'अजहर' सिनेमाचा किस्सा चांगलाच प्रसिद्ध आहे. 

नरगिस या सिनेमात बॉलिवूडचा 'सीरिअल किसर' इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) सोबत दिसली होती. सिनेमात दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. पण या सिनेमाच्या सेटवर नरगिससोबत असं काही झालं होतं की, ती लाजून लाल झाली होती. या सिनेमात इम्रान हाश्मीने माजी क्रिकेटर मोहम्मद अझरूद्दीनची भूमिका केली होती.

सोशल मीडियावर 'अजहर' सिनेमाचा मेकिंग व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात नरगिस फाखरी आणि इम्रान हाश्मी शूटिंग दरम्यानचे काही मजेदार किस्से सांगत आहेत. यात नरगिसने सांगितलं की, 'मला इम्रानला पाच वेळा किस करायचं होतं आणि मी यासाठी जास्त मानधन घेणार होती. कारण मला वाटत होतं की, हे माझ्या हातात नाही. नरगिस म्हणाली की, मला माहीत होतं की, इम्रान याने फार आनंदी होता. कारण याआधीही त्याने अनेकदा असं केलं आहे.

व्हिडीओत नरगिस शूटिंग वेळचा किस्सा सांगताना म्हणाली की, जेव्हा 'अजहर' मधील गाणं ‘बोल दो ना जरा’चं शूटिंग सुरू होतं तेव्हा दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही मी कन्टिन्यू इम्रानला किस करत राहिले. ज्यानंतर तिच्या लक्षात आलं आणि ती लाजली. व्हिडीओत तुम्ही नरगिस आणि इम्रानचा किसिंग सीनही बघू शकता. सोबतच हेही बघू शकता की, कशाप्रकारे दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही ती इम्रानला किस करत राहिली.  

टॅग्स :नर्गिस फाकरीइमरान हाश्मीबॉलिवूड