काही वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये एकाच नावाने दोन कलाकार आपली कारकीर्द घडवत होते. ते नाव म्हणजे राजकुमार. तसेच काहीसे सध्या मराठी इंडस्ट्रीमध्येही घडताना दिसत आहे. आता हेच घ्या ना, दिल चाहता है, डॉ. प्रकाश बाबा आमटे, अगं बाई अरेच्चा आणि असे बरेच हिंदी-मराठी चित्रपट केलेली सोनाली कुलकर्णी आणि सध्या गाजत असलेली नटरंग, क्लासमेट्स, शटर या चित्रपटातील ज्युनियर सोनाली कुलकर्णी. या ज्युनियर सोनालीने म्हणे नटरंग चित्रपटानंतर लोकांचा गोंधळ होऊ नये, म्हणून स्वत:च्या स्पेलिंगमध्ये बदल केला, तर दुसरीकडे सर्व तरुणाईला वेड लावणारा अभिनेता स्वप्निल जोशी आणि मराठीमध्ये डिबेट केलेला ‘ऐक’मधील ज्युनियर स्वप्निल जोशी. त्यामुळे आता बहुधा मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला नावातील साम्य असलेल्या अभिनेता-अभिनेत्रींचे कुतूहल न राहता लवकरच सवय होईल असे दिसते.
नावातील साम्य
By admin | Updated: August 20, 2015 01:52 IST