Join us  

चला हवा येऊ द्या: निलेश साबळेकडून हिसकावून घेतलं अँकरिंग? 'ही' नवीन चिमुकली दिसतीये सूत्रसंचालिकेच्या रुपात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 3:45 PM

Chala hawa yeu dya: या मंचावर आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे या सेलिब्रिटींची अनेक गुपितं अभिनेता, सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेने उघड केली आहे.

ठळक मुद्देझी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं अवितरतपणे मनोरंजन करणारा शो म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. मराठी कलाविश्वातील अनेक चित्रपटांचं प्रमोशन करण्यासोबतच हा शो त्यातील विनोदवीरांमुळेही प्रसिद्ध आहे. या मंचावर आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे या सेलिब्रिटींची अनेक गुपितं अभिनेता, सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेने उघड केली आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर चला हवा येऊ द्याच्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निलेश साबळेऐवजी 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील बालकलाकार परी अर्थात मायरा वायकुळ सुत्रसंचालन करताना दिसत आहे. इतकंच नाही तर झी मराठीवरील उत्सव नात्यांचा या सोहळ्यात अॅकरिंग कोण करणार यावरुनही ती भांडण करताना दिसत आहे. 

व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये, 'मायरा चला हवा येऊ द्या' शोची सुरुवात करताना दिसते. यावर निलेश साबळे म्हणतो, तू झी मराठी अवॉर्डचं अँकरिंग करणार आहेस का? त्यावर परी म्हणते हो.. तिच्या होकारावर निलेश म्हणतो, पण अँकरिंग तर मी करणार आहे. मला चॅनेलकडून फोन आला होता. पैसेही देणार आहेत. यावर मला सुद्धा फोन आला होता आणि मला सुद्धा पैसे मिळणार असल्याचं परी सांगते. त्यावर तुला किती पैसे मिळणार असा प्रश्न निलेश विचारतो. निलेशच्या या प्रश्नावर मायरा निरागसतेने बिस्कीटचा पूडा हे उत्तर देते. 

दरम्यान, अँकरिंग करण्यासाठी मायराला बिस्कीटचा पुडा देणार हे ऐकल्यावर मंचावर एकच हाशा पिकतो.विशेष म्हणजे या दोघांमधील गोड भांडण सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. 

टॅग्स :चला हवा येऊ द्याटिव्ही कलाकार