Join us  

राष्ट्रीय पुरस्कार विजेता संगीतकारावर आलीय वाईट वेळ, उदरनिर्वाहासाठी विकतोय घरातील वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 2:31 PM

उदरनिर्वाह करण्यासाठी घरातील भांडी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांना अभिनेता कबीर बेदीने मदतीचा हात दिला आहे.  

प्रसिद्ध संगीतकार वनराज भाटिया सध्या आयुष्यातील कठीण काळाशी लढाई करतायेत. 92 वर्षीय वनराज भाटियांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी घरातील भांडी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांना अभिनेता कबीर बेदीने मदतीचा हात दिला आहे.  

कबीर बेदीने ट्विटवरुन लोकांना वनराज भाटिया यांना मदत करण्याची विनंती केली आहे. या कठीण परिस्थिती त्यांच्यासोबत उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केले आहे. कबीर बेदीने ट्वीट केले,  मी काल वनराज भाटियांच्या घरी गेले होतो. ते एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहेत. आपल्या सर्व मित्रांना त्यांच्या सोबत उभे राहिले पाहिजे.   

कबीर बेदीच्या ट्वीटनंतर वनराज भाटिया यांना मदत करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. वनराज यांच्याकडे डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्यासाठी देखील पैसे नाहीत. प्रकृती ठीक नसल्याने बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध तुटला आहे. अमिताभ बच्चन यांच्या अजूबा सिनेमाला त्यांनी दिलेले संगीत खूप प्रसिद्ध झाले होते.

मुंबईतल्या घरात भाटिया इकटेच राहतात. छोट्या-मोठ्या कामांसाठी देखील त्यांना कोणाच्या तरी आधाराची गरज लागते. त्यांचा स्मृतीभ्रंश देखील झाला आहे. त्यांचे काही मित्र आणि फॅन्स त्यांना आर्थिक मदत करतायेत. वनराज भाटिया यांनी लग्न नाही केले. त्यांची बहीण आपल्या कुटुंबासह कनाडामध्ये राहते. त्यांचे काही नातेवाईक त्यांना मदत करतात. वनराज भाटिया राष्ट्रीय पुरस्कारांना, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि  पद्म श्री पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले आहे.      

टॅग्स :किरण बेदी