Join us  

मुन्ना अमर है! दिव्येंदु शर्माने सांगितलं, 'मिर्झापूर 3' मध्ये परत येऊ शकतो मुन्ना त्रिपाठी; कसा ते वाचा....

By अमित इंगोले | Published: November 05, 2020 11:00 AM

पहिल्या सीझनपासूनच दिव्येंदु शर्माने साकारलेली मुन्ना त्रिपाठीची भूमिका लोकांमध्ये फारच पॉप्युलर झाली होती. व्हिलनची भूमिका असूनही या भूमिकेला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

इंडियन वेबसीरीजचा विषय निघाला की, त्यात 'मिर्झापूर' या वेबसीरीजचं नाव टॉपलं घेतलं जातं. मोठ्या प्रतिक्षेनंतर मिर्झापूरचा दुसरा सीझन रिलीज झाला आणि प्रेक्षकांना पसंतही पडला. सीरीजमध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा आणि अली फजल यांच्या भूमिकांची फारच प्रशंसा करण्यात आली. पहिल्या सीझनपासूनच दिव्येंदु शर्माने साकारलेली मुन्ना त्रिपाठीची भूमिका लोकांमध्ये फारच पॉप्युलर झाली होती. व्हिलनची भूमिका असूनही या भूमिकेला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

वापसी करू शकतो मुन्ना त्रिपाठी?

दुसऱ्या सीझनमध्ये दाखवण्यात आलं आहे की, मुन्ना त्रिपाठीचा शेवटी अंत होतो. पण दुसरीकडे फॅन्स अजूनही पुढी सीझनमध्ये या भूमिकेच्या वापसीची वाट बघत आहेत. 'बॉलिवूड हंगामा' सोबत बोलताना मुन्नाची भूमिका साकरणाऱ्या दिव्येंदुने सांगितले की, फॅन्सने अनेक थेअरीजच्या माध्यमातून हे सांगितलं आहे की, कशाप्रकारे मुन्ना त्रिपाठीची भूमिका तिसऱ्या सीझनमध्ये वापसी करू शकते. एका थीअरी तर फारच इंटरेस्टींग आहे ज्याची चर्चा दिव्येंदुने केली.

असा परत येऊ शकतो मुन्ना

याबाबत बोलताना दिव्येंदुने सांगितले की, एका फॅनने त्याला सांगितले की, जगात कदाचित केवळ २ टक्के लोक असे असतात ज्यांचं हृदय उजवीकडे असतं. त्यामुळे जर मुन्ना स्वत:ला अमर म्हणतो तर गोलूने मुन्नाच्या छातीवर उजवीकडे बंदूक ताणली होती, पण मुन्नाने बंदूक डावीकडे केली होती. या हिशेबाने पाहिलं तर गोळी मुन्नाच्या हृदयावर लागलीच नव्हती. आणि तो वाचून पुन्हा परत येऊ शकतो.

गुरमीत सिंह आणि मीहिर देसाई यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या 'मिर्झापूर २' मध्ये दिव्येंदु शर्मासोबतच पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी अली फजल, हर्षिता गौड, कुलभूषण खरबंदा, रसिका दुग्गल, ईशा तलवार, विजय वर्मा आणि लिलीपुटसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले. अनेकांनी तर पहिल्या सीझनपेक्षा दुसरा सीझन अधिक चांगला  असल्याचे म्हटले आहे. आता तिसऱ्या सीझनमध्ये काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजवेबसीरिज