Join us

‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 15:57 IST

मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाच्या यशामुळे ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ हा या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातही प्रेक्षकांना पहिल्या

मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाच्या यशामुळे ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ हा या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातही प्रेक्षकांना पहिल्या भागप्रमाणे स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेची जोडी पाहायला मिळाली होती आणि आता ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मुंबई-पुणे-मुंबई ३ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू झाले असून, त्याच्या चित्रीकरणाला लवकरच सुरु वात होणार आहे. एखादा चित्रपट हिट झाला, की त्याचा सिक्वल बनवण्याचे फॅड आजवर आपल्याला हॉलिवूड आणि बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पाहायला मिळाले होते. आता मराठीतदेखील तोच ट्रेंड यायला लागला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.मुंबई-पुणे-मुंबई २ या चित्रपटानंतर अनेकांनी या चित्रपटाचा पुढचा भाग पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच तिसऱ्या भागाची जुळवाजुळव करण्याची या चित्रपटाच्या टीमने सुरु वात केली आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागातदेखील स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांचीच जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच, चित्रपटातील टीमदेखील तीच राहाणार असल्याचे म्हटले जात आहे.