Join us  

MTV Roadies 19th Season : ‘एमटीव्ही रोडिज्’ला रणविजय सिंघाचा अलविदा, कोण घेणार त्याची जागा?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 5:22 PM

MTV Roadies 19th Season : होय, नव्या सीझनमध्ये तुमचा आवडता होस्ट रणविजय सिंघा दिसणार नाही.

MTV Roadies 19th Season : तरूणाईचा आवडता शो ‘एमटीव्ही रोडिज्’चा (MTV Roadies )नवा सीझन येतोय. त्याचबद्दलचीच अपडेट आहे. नव्या सीझनमधून अभिनेता रणविजय सिंघा(Rannvijay Singha) बाद झाला आहे. होय, नव्या सीझनमध्ये तुमचा आवडता होस्ट रणविजय सिंघा आता दिसणार नाही.रणविजयने ‘एमटीव्ही रोडिज्’  पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. नंतर तो या शोचा होस्ट बनला आणि त्यानंतर शोचा मेंटॉर म्हणूनही त्यानं जबाबदारी सांभाळली. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या सर्व सीझनमध्ये तो मेंटॉर म्हणून दिसला. परंतु त्याचा हा प्रवास आता संपला आहे. त्याच्या जागी कोण येणार? हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर त्याचाही खुलासा झाला आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, रणविजयच्या जागी या शोसाठी सोनू सूदला (Sonu Sood) साईन करण्यात आलं आहे. त्यामुळे सोनू आता ‘एमटीव्ही रोडिज्’च्या या सीझनचा नवा चेहरा असणार आहे. अर्थात याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.चर्चा खरी मानाल तर, एक नवीन प्रॉडक्शन हाऊस ‘एमटीव्ही रोडिज्’चा नवा सीझन बनवणार आहे. रणविजय या प्रॉडक्शन हाऊसवर नाराज होता आणि या मतभेदांमुळे त्याने हा शो सोडला, अशी चर्चा आहे. रणविजय सध्या ‘शार्क टँक इंडिया’ हा शो होस्ट करतोय.  याबाबत रणविजयशी संपर्क केला असता तो म्हणाला, रोडिज्च्या नव्या एडिशनमध्ये माझ्या आणि चॅनलमध्ये काही गोष्टी निश्चित होऊ शकल्या नाहीत. शोसोबत माझ्या डेट्स मॅच होत नव्हत्या.

‘एमटीव्ही रोडिज्’ची सुरूवात 2000 मध्ये झाली होती. दुसऱ्या सीझनपासून या शोची लोकप्रियता प्रचंड वाढली आणि हा भारतीय टेलिव्हिजनचा सर्वाधिक  काळ चालणारा रिअ‍ॅलिटी शो बनला. पहिल्या सीझनपासून रघुराम या शोचा भाग होता. 11 वर्षानंतर त्यानेही हा शो सोडला होता.

टॅग्स :एमटीव्हीसोनू सूद