Join us  

'अ सूटेबल बॉय' विरोधात कायदेशीर कारवाई करणार मध्यप्रदेशचे गृहमंत्री, मंदिरातील किसींग सीनमुळे वाद....

By अमित इंगोले | Published: November 23, 2020 10:44 AM

मध्य प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे नेता गौरव तिवारी यांनीही यातील एका त्याच किसींग सीनवर आक्षेप घेतला होता. हा किसींग सीन एमपीतील महेश्वर मंदिरात शूट करण्यात आला. 

मीरा नायर यांच्या 'सुटेबल बॉय'मधील एका दृश्यावरून नेटकरी संतापले असून नेटफ्लिक्सवर बहिष्काराची मागणी जोर धरू लागली आहे. #BoycottNetflix ट्विटरवर ट्रेंडमध्ये असून अनेकजण हॅशटॅग वापरून आपला संताप व्यक्त करत आहेत. विक्रम सेठ यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून मीरा नायर यांनी सुटेबल बॉय नावाची मिनीसिरिजची निर्मिती केली. यामध्ये एक प्रेमी युगुल मंदिरात किस करत असतानाच दृश्य आहे. यामधील एक जण मुस्लिम, तर दुसरी व्यक्ती हिंदू आहे. याआधी मध्य प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे नेता गौरव तिवारी यांनीही यातील एका त्याच किसींग सीनवर आक्षेप घेतला होता. हा किसींग सीन एमपीतील महेश्वर मंदिरात शूट करण्यात आला. 

आता मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी एमपी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झालेल्या 'ए सूटेबल बॉय' चा किसींग सीन जर मंदिरात शूट झाला असेल तर ही हिंदूच्या भावनांसोबत छेडछाड आहे. त्यांनी या सीरीजच्या मेकर्सवर लीगल अ‍ॅक्शन घेण्याचेही संकेत दिले आहेत. (सुटेबल बॉयमधल्या 'त्या' दृश्यानं नेटकरी खवळले; नेटफ्लिक्सवर बहिष्काराची मागणी)

काय म्हणाले नरोत्तम मिश्रा?

नरोत्तम मिश्रा यांनी रविवारी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात ते म्हणाले की, 'एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'ए सूटेबल बॉय' नावाची सीरीज रिलीज करण्यात आली आहे. ज्यात फारच अपमानजनक दृश्य दाखवण्यात आले आहे. ज्याने एका धर्माच्या भावनांना ठेस पोहोचते. मी पोलिसांना या वादग्रस्त कंटेंटचं परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत'.

नरोत्तम मिश्रा हे एका दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाले की, ते नेटफ्लिक्स आणि या सीरीजच्या निर्मात्यावर व दिग्दर्शकावर कायदेशीर कारवाई करू शकतात. त्यांनी लिहिले की, 'पोलीस अधिकारी परीक्षण करून हे सांगतील की, संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सीरीजचे निर्माता-निर्देशकांवर धार्मिक भावना दुखावण्यासाठी काय कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते'.

टॅग्स :नेटफ्लिक्समध्य प्रदेशवेबसीरिज