Join us

मालिकेसाठी नाकारला चित्रपट

By admin | Updated: May 29, 2016 02:26 IST

दूर्वा या मालिकेत दुर्वाची भूमिका साकारणारी हृता दुर्गुळेला काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाची आॅफर आली होती. पण चित्रपटात काम करायचे असल्यास तिला मालिकेसाठी वेळ देता आला

दूर्वा या मालिकेत दुर्वाची भूमिका साकारणारी हृता दुर्गुळेला काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाची आॅफर आली होती. पण चित्रपटात काम करायचे असल्यास तिला मालिकेसाठी वेळ देता आला नसता. त्यामुळे मालिका सोडण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. पण मालिका आणि चित्रपट यांमध्ये हृताने मालिकेची निवड केली. दुर्वा या मालिकेमुळेच तिला खरी प्रसिद्धी मिळाली असल्याने तिने ही मालिका न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिला चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणार होती, असेही म्हटले जाते.