Join us  

Mirzapur Season 3 : अखेर प्रतीक्षा संपली..! २०२२मध्ये नाही तर या दिवशी भेटीला येत आहे कालीन भैय्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 12:47 PM

Mirzapur Season 3 : अभिनेता पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा यांच्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजलाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले, त्यानंतर निर्मात्यांनी 'मिर्झापूर सीझन २' बनवला जो खूप हिट झाला आणि आता मिर्झापूरचा तिसरा सीझनही लवकरच भेटीला येणार आहे.

अभिनेता पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा यांच्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजलाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले, त्यानंतर निर्मात्यांनी 'मिर्झापूर सीझन २' बनवला जो खूप हिट झाला आणि आता मिर्झापूरचा तिसरा सीझनही लवकरच भेटीला येणार आहे. तिसऱ्या सीझनची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'मिर्झापूर सीझन ३' कधी येणार याचीही माहिती समोर आली आहे.

प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीवर निर्माते 'मिर्झापूर ३' घेऊन येत आहेत. सीझन ३ मध्ये, कालिन भैय्या मुलगा मुन्नाच्या हत्येमुळे खूप संतप्त दिसणार आहे, तर दुसरीकडे, गुड्डू भैया पूर्वीपेक्षा अधिक डेंजर दिसणार आहे. या सीझनमध्ये कालिन भैय्या आणि गुड्डू भैय्या यांच्यात जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे. एकूणच, सीझन ३ मध्ये पूर्वीपेक्षा जास्त ड्रामा पाहायला मिळणार आहे, त्यामुळे हा सीझन आणखी मजेशीर असणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिर्झापूर सीझन ३ चे शूटिंग ऑगस्टपर्यंत संपणार आहे. त्याचवेळी, मिर्झापूर सीझन ३ यावर्षी रिलीज होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. ही वेब सिरीज २०२३ मध्ये फक्त अॅमेझॉन प्राइमवर स्ट्रीम केली जाईल. मात्र याबाबत अॅमेझॉन प्राइमकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सीझन ३ मध्ये अली फजल पूर्वीपेक्षा जास्त खतरनाक फॉर्ममध्ये दिसणार आहे. यावेळीही त्याला तुरुंगात जावे लागणार असून कालिन भैय्या आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेताना दिसणार आहे. अली फजलने सीझन ३ साठी शारिरीक खूप मेहनत घेतली आहे. त्याचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून प्रेक्षक हैराण होतील.

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजपंकज त्रिपाठीअली फजल