Join us  

"आई, मी आणि बाबा आम्ही सर्व...", संघर्षाचे दिवस आठवताच मिमोह चक्रवर्ती भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 6:48 PM

मिमोहने सांगितले की, त्याचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाल्यावर आई-वडिलांवर त्याचा काय परिणाम झाला होता.

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा मिमोह चक्रवर्तीचा 'रोश' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. इतकंच नाही तर मिमोहचा 'जोगिरा सारा रा रा' चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता अलीकडेच, अभिनेत्याने एका मुलाखतीत त्याचे संघर्षमय दिवसांच्या आठवणींनी उजाळा दिला. मिमोह सांगितले की, त्याचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाल्यावर याचा वडिलांवर काय परिणाम झाला.

मिमोहने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी एकदा एका कॉमेडी शोमध्ये गेलो होतो, तिथे कोणीतरी माझ्यावर कमेंट केली की मिमोहचा चित्रपट पाहिल्यानंतर असं वाटतं की 'योगिताच्या क्षमतेवर समस्या आहे'. या विनोदाने मला खरोखरच राग आला आणि मी म्हणालो, 'माझ्या आईबद्दल बोलू नका. बरं, बाबा इंडस्ट्रीतले आहेत. आईने तुमचं काय बिघडवलं आहे? तुम्ही कुणाच्या आईबद्दल बोलू शकत नाही.

या मुलाखतीत, मिमोह त्याच्या जिमी चित्रपटाबद्दल देखील बोलला. जिमी रिलीज झाल्यानंतर एका फिल्म रिव्ह्यूमध्ये  वाचला होता. मिमोह म्हणाला, 'मला आठवतेय की  मी एका रिव्ह्यूमध्ये वाचले होते होते की, मिमोह  ज्युनियर आर्टिस्ट होण्यासाठी देखील योग्य नाही. जिमीच्या रिलीजनंतर मी उद्ध्वस्त झालो होतो.'

मिमोहला पुढे विचारण्यात आले की, तिचा पहिला चित्रपट अयशस्वी झाल्यानंतर तिचे आई-बाबा सुद्धा रडले होते  का? यावर अभिनेत्याने उत्तर दिले, 'आई, मी आणि बाबा आम्ही सर्व रडलो. आमच्या सर्वांचे ब्रेकडाउन झाले होते. आता मी याबद्दल बोलत आहे, परंतु त्यावेळी हे सगळं खूप वेदनादायक होते. आजही तो काळ आठवला की खूप वाईट वाटतं.

टॅग्स :मिथुन चक्रवर्ती