Join us  

Anant Ambani-Radhika Engagement: अंबानींच्या पार्टीत मिका सिंगचीच चर्चा, 10 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी घेतले इतके कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 12:02 PM

Anant Ambani-Radhika Engagement: मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा काल मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. संध्याकाळी एंटीलियामध्ये जंगी पार्टी रंगली. अर्थात सर्वाधिक चर्चा झाली तर पार्टीची शान बनलेल्या मिका सिंगची.  

Anant Ambani-Radhika Engagement: दिग्गज व्यावसायिक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा काल मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला.  राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिरात राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दोघे जेव्हा मुंबईत पोहोचले तेव्हा त्यांचं मोठ्या धूमधडाक्यात स्वागत केलं गेलं. संध्याकाळी एंटीलियामध्ये जंगी पार्टी रंगली. बॉलिवूडचे बडे बडे सेलिब्रिटी या पार्टीला हजर होते. अगदी शाहरूख खान, सलमान खानपासून रणवीर सिंग, रणबीर सिंग, आलिया भट असे सगळेच या पार्टीत दिसले. अर्थात सर्वाधिक चर्चा झाली तर पार्टीची शान बनलेल्या मिका सिंगची (Mika Singh).  

होय, अनंत व राधिका यांचं एंटीलियामध्ये जंगी स्वागत झालं. अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मिका सिंगने आपल्या खास अंदाजात या कपलचं वेलकम केलं. यावेळी मिका सिंगने 10 मिनिटांचा परफॉर्मन्स केला. या 10 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी मिकाने किती कोटी घेतले माहितीये?

मीडिया रिपोर्टनुसार,मिका सिंगने या 10 मिनिटाच्या परफॉर्मन्ससाठी तब्बल 1.5 करोड रुपये आकारले होते. सोशल मीडियावर मिकाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

राधिका आणि अनंत अंबानी यांचा साखरपुडा राजस्थानमधील श्रीनाथजी मंदीरात पार पडला. त्यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. अनंत आणि राधिका गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अनंतनेअमेरिकेच्या ब्राऊन विश्वविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. रिलायन्स इंडस्ट्रीत जियो आणि रिलायन्स रिटेल वेंचर्सवर बोर्ड सदस्यच्या रुपात त्यानं विविध पदांवर काम केलं आहे. सध्या तो आरआईएल चा प्रमुख म्हणून काम पाहतो आहे.  राधिका न्यूयॉर्क विश्वविद्यालयात शिकली आहे आणि एनकोर हेल्थकेअर बोर्डाची संचालक आहे.

टॅग्स :मिका सिंगमुकेश अंबानी