Join us  

Mi Punha Yein: फिनाले एपिसोड्स...! सर्वांना चितपट करत कोण मिळवणार मुख्यमंत्रिपदाचा मुकूट?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 1:46 PM

Mi Punha Yein : ‘मी पुन्हा येईन’ या सीरिजला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. या सीरिजचे आत्तापर्यंत रिलीज झालेले काही भाग तुम्ही पाहिले असतीलच. आता ‘मी पुन्हा येईन’चे फिनाले एपिसोड्स तुमच्या आमच्या भेटीस येत आहेत.

Mi Punha Yein Planet Marathi OTT marathi  Web Series:  गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालथ झाली, त्याच्याशी मिळते जुळते संदर्भ असलेली ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरिज सध्या चांगलीच गाजतीये. प्लॅनेट मराठीवरच्या या सीरिजने सगळ्यांना वेड लावलं आहे.  या सीरिजचे शेवटचे दोन एपिसोड उद्या शुक्रवारी 12 ऑगस्टला रिलीज होत आहेत.

राजकारणावर आधारित या सीरिजमध्ये कट-कारस्थान, संधीसाधूपणा, आमदारांची फोडाफोडी, पळवापळवी आणि अलीकडे चर्चेत आलेलं ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ असा सगळा मसाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नवं सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर लगेच ही सीरिज आली. नवं सरकार स्थापन होताच त्यावर 20 दिवसांत सीरिज कशी तयार होऊ शकते? असा सवालही उपस्थित करण्यात आला. पण दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी सांगितल्यानुसार, या सीरिजचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.

‘मी पुन्हा येईन’चे दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी हे कधीच स्पष्ट केलं आहे. मागच्या वर्षी जुलैमध्ये मी पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून केलेली ही सीरिज आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कारण लेखक दिग्दर्शक म्हणून आपण वास्तवातल्या राजकारणाच्या पातळीवर पोचणं अशक्य आहे. हे एका सामान्य माणसाच्या नजरेतून पाहिलेलं राजकारण. राजकारणात काही खरं नाही, हेच खरं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

या सीरिजला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. या सीरिजचे आत्तापर्यंत रिलीज झालेले काही भाग तुम्ही पाहिले असतीलच. आता ‘मी पुन्हा येईन’चे शेवटचे दोन भाग उद्या तुमच्या आमच्या भेटीस येत आहेत. साहजिकच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

या सीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :वेबसीरिजभारत गणेशपुरेसयाजी शिंदेउपेंद्र लिमये सेलिब्रिटी