Join us

आक्कासाहेब घेणार प्रेक्षकांचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 03:12 IST

सासू-सुनेच्या नात्यावर आधारित आजवर अनेक मालिका झाल्या. मात्र, या सर्वांत लक्षवेधी ठरली एक मालिका. आता अक्कासाहेब प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

सासू-सुनेच्या नात्यावर आधारित आजवर अनेक मालिका झाल्या. मात्र, या सर्वांत लक्षवेधी ठरली एक मालिका. आता अक्कासाहेब प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. मालिकांची चाकोरी मोडून सासू-सुनेचं वेगळ्या प्रकारे उलगडलेलं नातं हे या मालिकेचं वेगळेपण. या मालिकेतील आक्कासाहेब आपल्या सुनांच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभ्या राहिल्या. मग तो पुनर्विवाह असो, शिक्षण असो किंवा नवं तंत्रज्ञान आत्मसात करणं आक्कासाहेबांनी कायमच सुनांचं समर्थन केलं. वेळप्रसंगी त्यांनी विरोधही पत्करला. तसंच गावातल्या लोकांच्या भल्यासाठी त्या धावूनही गेल्या. काळाच्या पुढचा विचार या मालिकेतून मांडण्यात आला. म्हणूनच प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरून प्रेम केलं. प्रेक्षकांनी केवळ मालिकेवर प्रेम केलं असं नाही, तर आक्कासाहेब या व्यक्तिरेखेला रोजच्या आयुष्यातही स्वीकारलं. मग ते ठसठशीत कुंकू-टिकली लावणं असेल, साडी नेसणं असेल, दागिने घालणं असेल किंवा त्यांच्यासारखं स्पष्ट बोलणं ठिकठिकाणी दिसू लागलं. अक्कासाहेबांवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं. या प्रेमाच्याच जोरावर ही व्यक्तिरेखा आयकॉनिक आणि लार्जर दॅन लाईफ ठरली. जवळपास दोन हजार भाग आणि सहा वर्षांचा टप्पा गाठल्यांतर ही मालिका लवकरच रसिकांना अलविदा म्हणणार आहे.