Join us

दुर्वा घेणार प्रेक्षकांचा निरोप

By admin | Updated: November 2, 2016 02:28 IST

दुर्वा ही मालिका गेली कित्येक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे.

दुर्वा ही मालिका गेली कित्येक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. या मालिकेतील दुर्वा आणि केशवची म्हणजेच हृता दुर्गुले आणि हर्षद आतकरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी काही वर्षांचा लीप घेतला. लीपनंतर हृता आणि हर्षद वगळता इतर सगळे नवीन कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले. लीपच्या आधी या मालिकेत प्रेक्षकांना दुर्वा पाटील आणि केशव साने यांची कथा पाहायला मिळाली होती. पण आता प्रेक्षकांना दुर्वाची मुलगी दुर्वाची कथा पाहायला मिळत आहे. दुर्वाची मुलगीदेखील तिच्यासारखीच आहे. समाजात होणाऱ्या वाईट गोष्टीवर ती आवाज उठवते. पण ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे कळतेय. दुर्वा ही मालिका लवकरच संपणार असून आम्ही दोघे राजाराणी ही नवी मालिका दुर्वाची जागा घेणार असल्याचे कळतेय. दुर्वा या मालिकेचे आता काहीच भाग शिल्लक असून लवकरच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण केले जाणार आहे.