Join us  

ओळखा पाहू बॉलिवूडच्या या स्टार किडला?, नुकतीच त्याने केलीय बॉलिवूडमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 6:00 AM

या बॉलिवूडच्या स्टारकिडने जुलैमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला.

मराठी सिनेइंडस्ट्री किंवा बॉलिवूडमधील कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असून ते त्यांच्या प्रोजेक्ट व खासगी आयुष्याबद्दल शेअर करत असतात. सध्या सेलिब्रेटी त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोंनादेखील चाहत्यांची पसंती मिळते. नुकताच मिजान जाफरी याने त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. त्यात तो ओळखताही येत नाही आहे.

मिजान जाफरी हा अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा आहे. मिजान सोशल मीडियावर सक्रीय असून तो सतत त्याचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच त्याने त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो खूप क्युट दिसतो आहे. मात्र त्याला ओळखता येत नाही आहे. 

मिजानने नुकतेच संजय लीला भन्साळींच्या बॅनरखाली बनलेल्या मलाल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्यासोबत या चित्रपटातून संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सेहगल हिने देखील पदार्पण केलं. या चित्रपटातील काही हिट झाली. मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. 

मिजान त्याच्या चित्रपटापेक्षा अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदासोबत अफेयर असल्याच्या चर्चेत जास्त असतो.

काही महिन्यांपूर्वी मिजान व नव्या यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या दोघांच्या लिंकअपचे वृत्त समोर आले होते.

मात्र याप्रकरणी मिजाननं खुलासा केला होता. त्याने सांगितलं होतं की, नव्या त्याच्या बहिणीची बेस्ट फ्रेंड आहे आणि ती त्याचीदेखील खूप चांगली मैत्रिण आहे.

टॅग्स :जावेद जाफरीनव्या नवेलीमिजान जाफरी