Join us

...तर मीडिया माझे लग्नही लावून देईल

By admin | Updated: September 29, 2014 06:21 IST

अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्या लग्नाबाबत मीडियामध्ये सातत्याने चर्चा होत असते

अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्या लग्नाबाबत मीडियामध्ये सातत्याने चर्चा होत असते; परंतु कॅटला त्याचे काही देणे-घेणे नाही. लग्नाबाबतच्या उलटसुलट बातम्या प्रसिद्ध करणाऱ्यांना मी रोखू शकत नाही. त्यांना काय छापायचे ते छापू द्या. येत्या दोन वर्षांत तरी माझ्याकडे स्वत:साठी वेळच शिल्लक नाही. मीडियाच्या मनात आले तर ते माझे लग्न लावूनही मोकळे होतील, असे कॅटरिनाने सांगितले. सलमान, हृतिक, शाहरुख, अक्षयकुमार, रणबीर कपूरसारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत कॅटने आतापर्यंत भूमिका केल्या आहेत. नंबर एकचा अभिनेता कोणाला मानतेस, अशी विचारणा केली असता, सर्व अभिनेत्यांमध्ये काही खास गुण आहेत, जे दुसऱ्यात नाहीत. शाहरुखला मी बॉलीवूडमधील आघाडीचा डान्सर मानते. आमिर हा सर्वांपेक्षा वेगळे करून दाखवतो, तर हृतिकचा डान्स म्हणजे वेगळेच रसायन आहे, असे कॅट म्हणाली.