Join us  

‘मस्तीजाद’ इज नॉट अ बिग डील -सनी

By admin | Published: December 25, 2015 2:07 AM

मिलाप जव्हेरी यांच्या ‘मस्तीजादे’ या सेक्स कॉमेडी चित्रपटात बोल्ड सीन्स साकारणे यासाठी कलाकार बांधील होते. पण, अभिनेत्री सनी लिओन म्हणते की

मिलाप जव्हेरी यांच्या ‘मस्तीजादे’ या सेक्स कॉमेडी चित्रपटात बोल्ड सीन्स साकारणे यासाठी कलाकार बांधील होते. पण, अभिनेत्री सनी लिओन म्हणते की, ‘ या चित्रपटासाठी शूटिंग करणे ही काही फार मोठी डील तिच्यासाठी नव्हती. इंडो-कॅनेडियन पॉर्न स्टार सनी लिओन जिने ‘जिस्म २’ मधून तिच्या करिअरची सुरूवात केली. ती म्हणते,‘ यूएसमध्ये कल्ट सेक्स कॉमेडी आम्ही शूट करतो. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही अशाप्रकारची सेक्स कॉमेडी मॅटर करत नाही. पण भारतात फारच वेगळ्या मानसिकतेचे लोक असल्यामुळे थोडे वेगळे वाटते. पण ते समजून घेण्यासारखे आहे. माझ्यासाठी ‘मस्तीजादे’ मधील शूटिंग ही बिग डील नव्हती. मी अमेरिकन टीव्हीमध्ये हे सर्व केले असल्याने माझ्यासाठी ते सर्व ठीक आहे.’ मस्तीजादेमध्ये वीर दास आणि तुषार कपूर हे दोघे असतील. सनी म्हणते की, सर्व चांगल्या गोष्टींसाठी वाट ही पहावेच लागते.