Join us

‘कान्स’मध्ये मस्तानीचा जलवा...!

By admin | Updated: May 20, 2017 03:53 IST

दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हल खऱ्या अर्थाने गाजवतेय, असे म्हणायला हरकत नाही. कान्सच्या पहिल्या दिवशी दीपिकाचा जलवा पाहण्यासारखा होता.

दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हल खऱ्या अर्थाने गाजवतेय, असे म्हणायला हरकत नाही. कान्सच्या पहिल्या दिवशी दीपिकाचा जलवा पाहण्यासारखा होता. सध्या कान्स सोहळ्याच्या निमित्ताने दीपिका फ्रान्समध्ये आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर ती एका इंटरनॅशनल फॅशन ब्रँडचे प्रतिनिधित्व करतेय. यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणारी दीपिका पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आणि सगळ्यांचे डोळे तिच्यावर टिकलेतं. कान्स सोहळ्याच्या रेड कार्पेटवर या ‘मस्तानी’चे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वप्रथम दीपिकाचे मेकअप करतानाचे फोटो व्हायरल झालेत. कान्ससाठी तयार होणाऱ्या दीपिकाच्या चेहऱ्यावरचा या फोटोंमधील आत्मविश्वास बघण्यासारखा आहे. मेकअप करताना दीपिका पांढऱ्या रंगाचा मेकअप टॉवेलमध्ये दिसली. यानंतर दीपिका लाल रंगाच्या मॅक्सी गाऊन निवडला. मीडियाशी बोलताना दीपिकाने हा रेड प्रिंटेड गाऊन कॅरी केला होता. या गाऊनमध्येही दीपिका कमालीची सुंदर दिसली. यानंतर सगळ्यांना प्रतीक्षा होती, ती दीपिकाच्या रेड कार्पेटवरील लुकची. रेड कार्पेटवर दीपिका कुठल्या आऊटफिटमध्ये उतरते, कशी दिसते, हे पाहण्यास सगळे उत्सुक होते आणि अखेर तो क्षण आला. दीपिका वाइन कलरच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर उतरली अन् सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर तेवढीच हॉट अन् सेक्सी दिसत होती. ड्रेससोबतचा तिचा स्मोकी डार्क मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालणारा होता. ज्वेलरी म्हणाल तर ड्रेसला मॅच इअररिंग्स व बोटात एक अंगठी एवढेच तिने घातले होते. कान्सकडे संपूर्ण जगाच्या नजरा या सोहळ्याकडे लागलेल्या असतात.