Join us  

मनमोहक डोळे, निरागस चेहरा; 30 पेक्षा जास्त सिनेमे बंद पडले अन्, लोकांनी अभिनेत्याला 'कमनशिबी' ठरवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:36 PM

जुगल हंसराजने बालकलाकार म्हणून 'मासूम' चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. एक काळ असा होता की जुगलचे 30 ते 40 चित्रपट बंद पडले होते.

 निरागस चेहरा, मनमोहक डोळे, मोहक हास्य.. तुम्हाला शेखर कपूर यांच्या  'मासूम' चित्रपटातील तो बालकलाकार आठवतोय का?, या चित्रपटात सगळ्यांना तो इतका आवडला होता की सगळे त्याच्याबद्दल चर्चा करत असत. शबाना आझमी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात जुगल हंसराजची खूप चर्चा झाली होती. . बालकलाकार म्हणून एवढी प्रसिद्धी मिळवल्यानंतर हा मोठेपणी नक्कीच यशस्वी अभिनेता बनणार असेच सगळ्यांना वाटत होते. जुगलसोबत इतरांनाही त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्याच्यात हिरो होण्यासाठी लागणारे सर्व गुण होते त्यामुळे तो इंडस्ट्रीचा नवा सुपरस्टार होईल असे वाटत होते पण प्रत्यक्ष तसं झाले नाही. त्याच्यावर 'अशुभ' असा शिका बसला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत जुगल त्याचे संघर्षाचे दिवस आठवून भावुक झाला होता.

शेखर कपूर यांचा 'मासूम' हा चित्रपट 1983 मध्ये प्रदर्शित झाला आणि जुगल हंसराजने एक वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर तो 'कर्मा' आणि 'सुलतनत' सारख्या चित्रपटात दिसला. तर अभिनेता म्हणून त्याने 1994 मध्ये 'आ गले लग जा' मधून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने 1996 मध्ये 'पापा कहते हैं', 2000 मध्ये 'मोहब्बतें', 2001 मध्ये 'कभी खुशी कभी गम', 2005 मध्ये 'सलाम नमस्ते', 2007 मध्ये 'आजा नचले' आणि 2016 मध्ये 'कहानी 2' काम केलं.

जुगल हंसराजने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील संघर्षाच्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, 'हा खूप कठीण काळ होता. जेव्हा माझे चित्रपट चांगले चालत नव्हते तेव्हा त्याला सामोरे जाणे माझ्यासाठी खूप कठीण होते. माझ्यावर केवळ टीकाच झाली नाही, तर माझ्यावर अनेकदा वैयक्तिक हल्लेही झाले. मला अनेक नावांनी हाक मारली गेली, अगदी 'कमनशिबी' म्हटलं गेलं.'

ते पुढे म्हणाले की, 'ज्या चित्रपटात मला अभिनय करायचा होता तेही सुरू झाले नाहीत आणि लोकांना मला बोलण्याची संधी मिळाली. मी जेव्हा इतर चित्रपटांच्या मुहूर्तावर जायचो तेव्हा लोक म्हणायचे, 'आता जुगल स्वत: त्याच्याच चित्रपटांच्या मुहूर्तावर जाणार आहे. तेव्हा मी 18-19 वर्षांचा होतो आणि या गोष्टी ऐकून मला रडू यायचं. पण त्यानंतर, मी या सर्व निराशाजनक गोष्टींना सामोरे जाण्यास शिकलो.'

जुगल पुढे म्हणाला, 'मी चित्रपट साईन करायचो आणि त्या चित्रपटाचं शुटिंग सुरू होण्याआधीच तो बंद पडायचा.मला फोन यायचा की आता चित्रपट बनत नाही. जेव्हा मी फक्त 'धन्यवाद' म्हणू शकलो. मी सुन्न राहायचो, काय बोलावे समजत नव्हते? जेव्हा तुम्ही कठोर परिश्रम करता आणि तुमच्यासमोर आव्हाने असतात तेव्हा हे खूप कठीण होते.

टॅग्स :जुगल हंसराज