आपले स्वप्न उराशी बाळगून अनेक जण स्वप्नांची नगरी मुंबईत येतात. या मायानगरीने अनेक कलाकारांना आपल्याकडे आकर्षित केले आहे आणि घडविले देखील आहे. असं असतानाही मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने मुंबईला गुड बाय केले आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही बाब सांगितली आहे.
मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच मृण्मयीने एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने बाय बाय मुंबई असे लिहिले होते.
नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा मृण्मयी देशपांडेने उमटविला आहे. मृण्यमयीने फर्जंद सिनेमात साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती.