Join us

‘मराठी रंगभूमी अभिनयसमृद्ध’

By admin | Updated: January 18, 2017 03:04 IST

'अझर, ब्लॅक, गुजारिश, रॉय, रॉकस्टार, तलाश अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून शेरनाझ पटेल यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली.

-बेनझीर जमादार'अझर, ब्लॅक, गुजारिश, रॉय, रॉकस्टार, तलाश अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून शेरनाझ पटेल यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. या बॉलिवूडच्या तगड्या अभिनेत्रीचे रंगभूमीशीदेखील तितकेच जिव्हाळ्याचे नाते आहे. तिच्या या अभिनय प्रेमाविषयी तिने रंगभूमी आणि चित्रपटाविषयी ‘लोकमत सीएनएक्स’सोबत साधलेला संवाद. कलाकाराच्या जीवनात रंगभूमी किती आवश्यक असते?- प्रत्येक कलाकाराला नाटक करणे आवश्यक आहे. कारण अभिनयासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या भावना आणि हावभाव या सर्व गोष्टी मुळात रंगभूमीवरच मिळू शकतात. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाने रंगभूमीचे धडे घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयातदेखील अभिनयाचे धडे देणे महत्त्वाचे आहे.तू अनेक बॉलिवूड चित्रपट केले आहेत. त्यामुळे चित्रपट आणि नाटक यामध्ये तुला काय फरक जाणवितो?- कलाकार म्हणून चित्रपट आणि नाटक यामध्ये फक्त माध्यमांचा फरक जाणवतो. चित्रपटासाठी कॅमेऱ्यासमोर काम करतात. नाटक सादर करताना तुम्हाला लाइव्ह अभिनय करावा लागत असतो. जी प्रोसेस असते तरी तर सेमच असते. त्यामुळे जास्त काही फरक जाणवत नाही.मराठी आणि हिंदी नाटक यांचा प्रेक्षकवर्ग कसा आहे?खरं सांगू का, हिंदी नाटकांच्या तुलनेत मराठी प्रेक्षकवर्ग हा खूप मोठा आहे. तसेच मराठी प्रेक्षक हे आपल्या आवडत्या कलाकाराला लाइव्ह अभिनय करताना पाहणे अधिक पसंत करत असतात. त्यामुळे मराठी नाटकाला चांगले दिवस आहेत. मुंबईमध्ये तर हिंदीपेक्षा मराठी व्यावसायिक नाटके जास्त चालतात. मात्र मराठी नाटक जे पाहतात ते प्रेक्षक हिंदी नाटक पण पाहतात त्यामुळे प्रेक्षकवर्ग दोन्हींकडे आहे असे मला वाटते. मराठी नाटकांविषयी तुझे काय मत आहे?- मराठी नाटके ही खूपच उत्कृष्ट असतात. महाराष्ट्रात रंगभूमीसाठी जे टॅलेन्ट आहेत ते इतर कोणत्याही ठिकाणी नाही. नैसर्गिक अभिनय जो असतो, तो मी मराठी कलाकारांमध्ये जास्त पाहिला आहे. मी सर्वाधिक मराठी नाटक पाहणे पसंत करते. कारण मराठी कलाकारांकडून खूप काही शिकण्यास मिळते. हे कलाकार लहानपणापासून अभिनय करत असतात. या क्षेत्राकडे ग्लॅमर म्हणून पाहणाऱ्या तरुणाईला तू काय सल्ला देऊ इच्छिते?- मला स्वत:ला असे वाटत नाही, की आजची तरुणाई या क्षेत्राकडे ग्लॅमर म्हणून पाहते. कारण आजची तरुणाई ही सर्वच माध्यमाला शंभर टक्के देताना दिसत आहे. पूर्वी असे चित्र पाहायला मिळायचे की, नाटक केल्यावर चित्रपट मिळेल. यानंतर चित्रपट मिळाले की नाटक करायचे नाही. आता मात्र आजची तरुणाई नाटक, मालिका, लघुपट, वेबसीरीज आणि चित्रपट सर्व काही करत असते. ही मुले नाटक कधीही सोडत नाहीत. त्यामुळे आजच्या तरुणांची हीच खासियत आहे असे म्हणण्यास हरकत नाही.