Join us  

'वेड' सिनेमाची वर्षपूर्ती, रितेश-जिनिलियाने BTS Video शेअर करत दिला आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 6:25 PM

'वेड' सिनेमातून रितेश देशमुखने पहिल्यांदा दिग्दर्शनात पदार्पण केले.

महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि वहिनी जिनिलिया (Genelia Deshmukh) यांच्या 'वेड' सिनेमाने साऱ्यांनाच वेड लावलं होतं. मराठीतील या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या रिलीजला बघता बघता एक वर्ष पूर्ण झालं आहे. ३० डिसेंबर 2022 रोजी एक वर्षापूर्वी हा सिनेमा रिलीज झाला होता. तब्बल ७० कोटींची कमाई करत सिनेमाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. वर्षपूर्तीनिमित्त रितेश आणि जिनिलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

'वेड' सिनेमातून रितेश देशमुखने पहिल्यांदा दिग्दर्शनात पदार्पण केले. आपला पहिला दिग्दर्शित सिनेमा हा मराठीच असावा असंच त्याला हवं होतं. तर जिनिलियाचा हा पहिलाच मराठी सिनेमा. दोघांनी सोशल मीडियावर या संपूर्ण प्रवासाचा आणि शूट दरम्यान घडलेल्या बिहाईंड द सीन्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रितेशच्या आई पहिल्यांदाच सेटवर आल्या. त्यामुळे त्यांच्याच हस्ते सिनेमाच्या मुहुर्ताचा क्लॅप देण्यात आला. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया, वानखेडे सारख्या ठिकाणी सिनेमाचं शूट झालं. त्याचीही झलक या व्हिडिओत दिसते. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले,'वॉव! आम्हाला विश्वासच बसत नाहीए की एक वर्ष झालं. असं वाटतंय कालच घडलंय. गेल्या वर्षी याच दिवशी आम्ही खूप नर्व्हस तरी उत्साहित होतो.आज तुमचं हे प्रेम आणि कौतुक पाहून आम्ही धन्य झालो.'

वेड' हा चित्रपट ३० डिसेंबरला रिलीज झाला होता. रिलीजनंतरच्या पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने ४० कोटी तर तिसऱ्या आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार केला. ५० दिवसांत 'वेड'ने जगभरात ७३. ५० कोटींचा गल्ला जमवला होता तर देशात ६०. ६७ कोटींचा बिझनेस केला होता.  'वेड'ने एकूण ७५ कोटींची कमाई केली होती. 

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजामराठी अभिनेता