Join us

‘बँजो’साठी नर्गिस फकरी घेतेय मराठीचे धडे

By admin | Updated: January 30, 2016 03:16 IST

आजकाल बॉलीवूड सेलीब्रिटींना झालंय तरी काय? कारण कोणी मराठी चित्रपटात पदार्पण करतायत, तर कोणी मराठी शिकायच म्हणतायत. आता विद्या बालनचंच पाहा ना, ‘एक अलबेला’

आजकाल बॉलीवूड सेलीब्रिटींना झालंय तरी काय? कारण कोणी मराठी चित्रपटात पदार्पण करतायत, तर कोणी मराठी शिकायच म्हणतायत. आता विद्या बालनचंच पाहा ना, ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत ती पदार्पण करीत आहे. तर दुसरीकडे बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फकरीने रवी जाधव दिग्दर्शित ‘बँजो’ या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी मराठीची शिकवणी चालू केली आहे. आता तुम्ही हा विचार करणं साहजिक आहे की चित्रपट तर हिंदी आहे; मग नर्गिस मराठी का शिकत आहे? ऐका तर मग, बँजो चित्रपट जरी हिंदी असला, तरी तो संगीताशी निगडीत असून त्यात मराठी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. त्यामुळे नर्गिसला मराठी शिकणे तर गरजेचेच आहे ना. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून, रितेश देशमुख यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.