Join us  

टॅलेंटला महत्त्व दिल्यास मराठी इंडस्ट्रीला मिळणार न्याय -तेजश्री प्रधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 3:35 PM

मालिका, नाटक आणि चित्रपट या तीनही माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तेजश्री सोबतच या मालिकेत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसतील. एकंदरीत आतापर्यंतच्या प्रवासाबाबत तेजश्रीसोबत ‘सीएनएक्स’ने मारलेल्या मनसोक्त गप्पा...

-रवींद्र मोरेमालिका, नाटक आणि चित्रपट या तीनही माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तेजश्री सोबतच या मालिकेत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसतील. एकंदरीत आतापर्यंतच्या प्रवासाबाबत तेजश्रीसोबत ‘सीएनएक्स’ने मारलेल्या मनसोक्त गप्पा...* आपल्या नव्याने सुरु झालेल्या मालिकेबद्दल काय सांगाल?- खूप उत्साहित आहे मी या मालिकेबद्दल. दैनंदिन मालिकेचा आपण जो आत्मा म्हणतो तो म्हणजे सासु-सूनचे नाते. आपण अनेक सासु-सूनेच्या मालिका पाहिल्या असतील, मात्र ही मालिका इतर मालिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. आतापर्यंत आपण सासु-सूनांना आई-मुलीच्या रुपात आणि एकमेकांना सांभाळताना पाहिले असेल, मात्र यात सासु आणि सून मैत्रिणीच्या रुपात दिसणार आहेत आणि मी नक्की सांगू शकते की, ही मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल. यात मी सूनची भूमिका साकारत असून ही आतापर्यंतच्या मालिकांमधल्या सुनांपेक्षा वेगळी सून आहे. ती संस्कारक्षम, सक्षम आणि सासुवर प्रचंड प्रेम करणारी सून आहे.* ही भूमिका साकारण्यासाठी तुम्हाला काय विशेष तयारी करावी लागली?- खरं सांगायचं झालं तर पहिला प्रोमो रिलीज झाल्यानंतर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरुन लोकांना मालिकेचे कथानक आवडत आहे असे वाटतेय. विशेष म्हणजे लोकं या मालिकेबाबत खूपच उत्साही असल्याने एक वेगळी जबाबदारी वाढल्याची जाणिव होत आहे. पहिल्या भागासाठी आम्हाला सर्वांना चिंता वाटली की, कसं होईल, काय होईल, सर्व ठिक होईल ना? असा थोडा प्रेशर आहे. वेगळी तयारी म्हणण्यापेक्षा आम्ही सर्व टिम शूटिंगच्या अगोदर भेटून सर्वांच्या भूमिका समजून घेतल्या. त्यावर चर्चा केली.* तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल काय सांगाल ?- आता तरी सध्या याच मालिकेवर फोक स आहे. एखाद्या प्रोजेक्टवर काम सुरु असताना दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करणे शक्य नाही. मी अगोदर एका प्रोजेक्टमध्ये काम केले होते, त्याचे दिग्दर्शकच याच मालिकेचे दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांना माझे बलस्थाने माहिती आहेत. शिवाय त्यांच्याबरोबर मला काम करण्याचा अनुभव असल्याने मलाही आता पाहिजे ते दडपण वाटत नाहीय.* मराठी सिनेमातही आता वेगळेपण जाणवत आहे, प्रेक्षकांना अजून काय अपेक्षीत आहे, याबाबत काय सांगाल?- तुम्ही जे काही चांगलं द्याल ते प्रेक्षकांना आवडते आणि वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. तेच तेच दिल्याने नाकारणारा हाच प्रेक्षक वर्ग आहे आणि नाविण्यपूर्ण दिल्यानं भरभरुन प्रेम करणारा पण हाच प्रेक्षक वर्ग आहे. नाटक, मालिका, सिनेमा यांपैकी कुठलंही माध्यम असो, जर चांगलं दिलं तर प्रेक्षक प्रेमाने स्वीकारतात.* बऱ्याचदा मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाही, काय सांगाल याबाबत?- याबाबत मी मराठी इंडस्ट्रीला थोडीसी दुर्दैवी म्हणू शकते. त्याचवेळी एखादा हिंदी मोठा चित्रपट रिलीज झाला तर त्याच्याबरोबरीने मराठी चित्रपट तग धरु शकत नाही. कारण थिएटर मिळविण्यापासून ते मार्केटिंगपर्यंत हिंदी दिग्दर्शकाने मोठा पैसा खर्च केला असतो. त्यातुलनेने मराठी दिग्दर्शक कमी पडतो. मात्र पैशांऐवजी जर टॅलेंटला धरुन या समस्येवर जर तोडगा काढला गेला तर एक कलाकार म्हणून मला नक्की आवडेल.

टॅग्स :सेलिब्रिटीतेजश्री प्रधान